मुंबई : राज्यात ७०० कोटींची ई-चलन थकीत असून, त्यामध्ये मुंबईतील ४० टक्के ई-चलन आहे. ई-चलनची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी मुंबईतील वाहतूक पोलीस आता वाहनचालकांच्या घरी जाणार आहेत.
एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले की, दंड वसूल करण्यासाठी ते एखाद्याच्या घरी जाऊन त्या व्यक्तीला सर किंवा मॅडम म्हणून संबोधतील. ते कलेक्शन एजंटप्रमाणे उद्धटपणे वागणार नाहीत. जर वाहनचालक दंड भरण्यास तयार असेल, तर कर्मचारी रोख रक्कम गोळा करतील आणि पावती देतील. जर ती व्यक्ती दंड भरू शकली नाही, तर त्याला किंवा तिला लवकरात लवकर तसे करण्याची विनंती केली जाईल.
मुंबईत सुमारे ३१७ कोटी रुपयांची थकीत आहेत, ते वसूल करण्यासाठी वाहतूक पोलीस १५ डिसेंबरपासून मोहीम सुरू करणार आहे. घरोघरी जाऊन दंड वसूल करण्यासाठी प्रत्येकी दोन पोलिसांसह ११ पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्या भेटीपूर्वी वाहतूक पोलीस वाहनचालकांना वाहतूक विभागाच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून याची माहिती देणार आहे.
चार वर्षांपूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली होती, पण अनेक जण पैसे न भरले नाही.