Join us

प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 6:47 PM

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याकडे जाणा-या प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ठाणे - मुलुंडदरम्यान बंद पडले. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे.

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याकडे जाणा-या प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ठाणे - मुलुंडदरम्यान बंद पडले. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे - मुलंड रेल्वे क्रॉसिंगजवळ एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करणा-या प्रगती एक्स्प्रेसच्या मोटरमनने अर्जंट ब्रेक लावल्याने इंजिनचा एक पाईप तुटला. मात्र, एवढे करुन सुद्धा एक्स्प्रेससमोर आलेली महिला वाचली नाही, अशी माहिती प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच, घरी निघालेल्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी म्हणून जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मात्र ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईतील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

टॅग्स :रेल्वे प्रवासीमुंबई लोकल