Join us

मुंबईतील रस्त्यावर वाहतूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:08 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेसाठीच लोक पडले घराबाहेर पडत होते. मात्र अनलॉक ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेसाठीच लोक पडले घराबाहेर पडत होते. मात्र अनलॉक झाल्यावर मुंबईतील रस्त्यावर वाहतूक ८० टक्क्यांपर्यंत वाढली आहे, असे वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईच्या रस्त्यावर मंगळवारी वाहनांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. यापूर्वी लॉकडाऊन अंमलबजावणी असल्याने सर्व दुकाने, कार्यालये बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सुरू होती. पण आता निर्बंध शिथिल होताच रस्त्यावरील गर्दी वाढली आहे. कोरोनापूर्वी सध्या रस्त्यावर जी वाहनांची गर्दी होते. त्याच्या तुलनेत ८० टक्के वाहने रस्त्यावर आली आहेत. निर्बंध शिथिल झाल्यामुळे अनेक जण घरातून बाहेर पडत आहेत. दादर, वरळी, एलबीएस मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस वे, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, फ्री वे, लालबाग उड्डाणपूल, बीकेसी या भागात वाहनांची वर्दळ वाढली आहे.