मेगाब्लॉकने प्रवाशांची त्रेधातिरपीट

By admin | Published: June 29, 2014 11:09 PM2014-06-29T23:09:29+5:302014-06-29T23:09:29+5:30

अप धीम्या गतीसह हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड-बांद्रा-अंधेरी स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक होता.

Traffic stroke of megablock passengers | मेगाब्लॉकने प्रवाशांची त्रेधातिरपीट

मेगाब्लॉकने प्रवाशांची त्रेधातिरपीट

Next
>ठाणो : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार-भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या गतीसह  हार्बरच्या सीएसटी-कुर्ला आणि वडाळा रोड-बांद्रा-अंधेरी स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक होता. हा ब्लॉक स. 11.15 ते दु. 3.15 वा.र्पयतच्या कालावधीत होता.  मुख्य मार्गावरील सर्व लोकल ब्लॉकच्या कालावधीत अप जलद गती मार्गावरून धावल्याने धीम्या मार्गावर त्या कालावधीत लोकल नव्हत्या. जलद मार्गावरील त्या लोकल भायखळ्यानंतर पुन्हा धीम्यामार्गे धावल्याने प्रवाशांचा गोंधळ झाला.
जलद गती मार्गावरुन लोकल धावणार असल्या तरीही त्या सर्व लोकल कुर्ला, सायन, दादर, 
परेल या सर्व स्थानकांत थांबणार असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले होत़े मात्र, तरीही प्रवाशांनी या सूचनांकडे कानाडोळा केल्याने गोंधळात अधिक भर पडली. या कालावधीत अप दिशेवर करी रोड, चिंचपोकळी स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध नव्हत्या़ त्यामुळे या स्थानकांतील प्रवाशांचेही हाल 
झाले. त्यामुळे या स्थानकांत येणा:या प्रवाशांना आहे त्याच तिकीट/पासावर भायखळा स्थानकात जाऊन डाऊनमार्गे प्रवासाची मुभा देण्यात 
आली होती़ परंतु, त्या उलटय़ा 
दिशेने प्रवासाचा त्यांना त्रस 
झाला. 
हार्बरच्या सीएसटी-कुर्ला डाऊन दिशेवर तर वडाळा रोड-बांद्रा येथील अप-डाऊन दिशांवर मेगाब्लॉक होता.  या कालावधीत बांद्रा-अंधेरीच्या सीएसटीहून सुटणा:या व तेथे येणा:या सर्व गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे तुलनेने अधिक हाल झाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी स. 1क् ते संध्याकाळी 6 या कालावधीत आहे त्याच तिकीट, पासावर पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आली होती़ मात्र, स्थानकांमध्ये आल्यावर उद्घोषणा यंत्रंवरून देण्यात येणा:या सूचनांवरून ही बाब समजल्याने प्रवाशांची पंचाईत झाली होती. त्यामुळे दादरसह विविध स्थानकांमध्ये त्यांची लगबग दिसून आली. (प्रतिनिधी)
 
च्रेल्वे रुळ, सिगAल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी वसई रोड-भाईंदर या स्थानकांदरम्यान अप, डाऊनच्या जलद मार्गावर पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन जम्बोब्लॉक  घेण्यात आला. 
च्हा ब्लॉक रात्री 11 ते पहाटे 3 अप जलद मार्गावर होता़ त्यामुळे रविवारी दिवसभर प्रवाशांना विनाखंड प्रवासाची मुभा मिळाल्याने त्या मार्गावरील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

Web Title: Traffic stroke of megablock passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.