सलग सुट्ट्यांच्या विकेण्ड मूडमध्ये वाहतूक कोंडीचा अडथळा, मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे जाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 11:09 AM2017-12-23T11:09:26+5:302017-12-23T13:35:47+5:30

मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतुकीचा खोळंबा झाला असून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

Traffic Stumbling block in consecutive Weekend Moods, Mumbai-Pune Express-Jay Jam | सलग सुट्ट्यांच्या विकेण्ड मूडमध्ये वाहतूक कोंडीचा अडथळा, मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे जाम

सलग सुट्ट्यांच्या विकेण्ड मूडमध्ये वाहतूक कोंडीचा अडथळा, मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे जाम

Next
ठळक मुद्देमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या प्रचंड रांगा सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे

लोणावळा -  शनिवारी व रविवारला जोडून आलेली सोमवारची नाताळाची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्टया आल्यानं लोणावळ्यासह मह‍बळेश्वर, कोल्हापुर भागातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.

सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुण्याकडे येणा-या मार्गिकांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत. द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महामार्ग पोलीस प्रयत्न करत आहेत. पुण्याकडे येताना घाट क्षेत्रात वाहने बंद पडल्यास तातडीने ती बाजुला करण्याकरिता क्रेन सर्व्हिस उपलब्ध केलेली आहे. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहनांच्या लांबवर रांगा गेल्या आहेत. मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बाह्य वळण ते खंडाळा बोगदा दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरांकडील एक लेन बंद केल्याने दोन लेनवर वाहतुकीचा ताण येत वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.

चौथा शनिवार, रविवार आणि ख्रिसमस असे सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक प्रवासी द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच लोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय मार्गावर देखिल वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.

मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. खंडाळा घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली असून गाड्या शेडुंग फाट्यावरुन वळवण्यात आल्या आहेत. तसंच अवजड वाहनांची वाहतूक जुन्या हायवेवरुन वळवण्यात आली आहे. खालापूर टोलनाक्यावर जवळपास चार किमी लांब रांगा लागल्या आहेत. टोलनाक्यावर गाड्यांची रांग लागली असल्या कारणाने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई - नाशिक हायवेवरील वाहतूकही मंदावली आहे.

फक्त मुंबई -पुणे नाही तर मुंबई - गोवा आणि अहमदाबाद हायवेवरही वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबई - गोवा हायवेवर पेणजवळ प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. कोकणात जाणा-या रस्त्यांवर गाड्यांच्या चार ते पाच किमी लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई - अहमदाबाद हायवेवरही हीच परिस्थिती आहे.  

Web Title: Traffic Stumbling block in consecutive Weekend Moods, Mumbai-Pune Express-Jay Jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.