Join us

वाहतूक नियम उल्लंघन महागात, तीन हजार बसवर कारवाई, दोनशे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:07 AM

परिवहन विभागाची विशेष खासगी प्रवासी बस तपासणी मोहीमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नुकत्याच राबविलेल्या खासगी ...

परिवहन विभागाची विशेष खासगी प्रवासी बस तपासणी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नुकत्याच राबविलेल्या खासगी प्रवासी बसच्या विशेष तपासणी मोहिमेत ३,०६२ दोषी बसवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २१३ बस जप्त करण्यात आल्या.

राज्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेत साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ते प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाच्या एकूण ६२३ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वाधिक ठाणे विभागात ५३९ बसवर कारवाई झाली असून, ३२ बस जप्त करण्यात आल्या. मुंबईत एकूण २२३ बसवर कारवाई करण्यात आली असून, ९ बस जप्त करण्यात आल्या.

या मोहिमेत विना परवाना अथवा परवान्यांच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर तपासणी, वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर, जादा भाडे आकरणे आदी बाबींची तपासणी करण्यात आली.

..............................................