मुंबई - पश्चिम रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशीरानं सुरु आहे. डहानू -पनवेल मेमू न थांबवल्यामुळं प्रवाशांचा संताप आनावर झाला. त्यामुळं प्रवाशांनी अंदोलन केलं. अंधेरी, इमरेळी त्याचप्रमाणे केळवे स्थानाकात लोकल थांबवून ठेवल्यामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिट उशीरानं सुरु आहे. सकाळी कार्यलयात जाण्याची गाडी चुकल्यामुळं प्रवाशांची चांगलीत धावपळ उडाली. त्यात आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला. प्रवाशांनी काही काळ अंधेरी स्टेशनमध्येही आंदोलन करत गाडी रोखली. काही काळानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
उमरेळी स्थानकात ट्रेन न थांबवल्यामुळं प्रवासी आक्रमक झाले आहेत. त्यामुळं उमरेळीसह अंधेरी आणि केळवे स्थानकातही प्रवाशांनी आंदोलन केलं.
(आणखी वाचा - मध्य रेल्वेच्या रोजच्या विलंबाला प्रवाशी नाराज, व्यक्त केली नाराजी )
डहाणू येथून सुटणारी5.54 ची पनवेल मेमो उमरोळी प्लॅटफॉर्म वर न थांबता चेन पुलिंग नंतर उमरोळी पेट्रोल पंपावर जाऊन थांबली , 7-8 मिनिटांचा थांबा घेऊनही गाडी पुन्हा प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली नाही. त्यामुळे मोटरमन वर कारवाई साठी पालघर स्टेशन अधिक्षका ला उमरोळीकर आणि डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने घेराव घातला.रेल्वे चे डीआरएम मुकुल जैन ह्यांनी मोटरमन प्रशांत जेंना ह्याला केले निलंबित