- चेतन ननावरेमुंबई : माल वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जाणवू लागला असून मराठवाड्यात औद्योगिक पट्ट्यात व्यवहार ठप्प झाले आहेत. चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारही मंगळवारपासून संपात उतरणार आहेत.संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, फळे, कांदा- बटाटा व धान्याची आवक कमी झाली. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील माल वाहतुकीवरही परिणाम झाला. ‘एपीएमसी’च्या ट्रक टर्मिनल व रस्त्यावर पाच हजारांपेक्षा जास्त ट्रक उभे होते. मुंबई व नवी मुंबईत किरकोळ दुकानदारांना पुरवठाही झालेला नाही. जेएनपीटीत कंटेनर वाहतूक ४० टक्क्यांनी कमी झाली.सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त माथाडी कामगारांना सुट्टी आहे. त्यानंतर माथाडी संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले.मंगळवारपासून तीव्र परिणाम दिसणारअत्यावश्यक सेवेला चक्काजाम आंदोलनापासून दूर ठेवण्यात आले आहे. मात्र मंगळवारपासून बाजारपेठांमध्ये चक्काजाम आंदोलनाचे तीव्र परिणाम दिसू लागतील, असे बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सरचिटणीस अनिल विजन यांनी सांगितले. मुंबईच्या बाजारपेठांमधील वाहतूक ठप्प पडल्याने दोन दिवसांत सुमारे २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ‘बीजीटीए’चे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी दिली.
माल वाहतूकदार होणार आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 2:18 AM