मगरींच्या पिल्लांची तस्करी; मुंबई विमानतळावर दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 08:40 AM2024-09-29T08:40:36+5:302024-09-29T08:40:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बँकॉकहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांना मगरींच्या तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या ...

trafficking in baby crocodiles; Two arrested at Mumbai airport | मगरींच्या पिल्लांची तस्करी; मुंबई विमानतळावर दोघांना अटक

मगरींच्या पिल्लांची तस्करी; मुंबई विमानतळावर दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँकॉकहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांना मगरींच्या तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांनी एका बॉक्समध्ये या पाच छोट्या मगरी ठेवल्या होत्या. मगरींची तस्करी पाहून अधिकारीदेखील चक्रावून गेले होते.

विस्तारा कंपनीच्या विमानाने बँकॉक येथून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करत त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यांच्याकडीस एका बॉक्समध्ये मगरींची पिल्ले आढळली.

पुन्हा मूळ अधिवासात
एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगेत एक छोटा बॉक्स आढळून आला. त्यामध्ये या मगरी ठेवल्या होत्या. यानंतर अधिकाऱ्यांनी वन्यजीव तज्ज्ञांना बोलावून घेतले. या मगरी दमल्याचे तसेच तहानल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आले. या मगरींना पुन्हा त्यांच्या देशात व मूळ अधिवासात पाठविण्यात आले. कायद्यानुसार या मगरींची तस्करी हा गुन्हा आहे. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: trafficking in baby crocodiles; Two arrested at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.