Join us  

कुंभवली रस्त्याच्या दुर्दशेने वाहतूक थंड

By admin | Published: July 29, 2014 12:07 AM

तारापूर एमआयडीसीजवळील कुंभवली ते मुरबे रस्त्याची प्रचंड दुर्दशा होऊन प्रवासी वाहतुकीस रस्ता धोकादायक झाल्याने अखेर त्या रस्त्यावरून एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली

पंकज राऊत, बोईसरतारापूर एमआयडीसीजवळील कुंभवली ते मुरबे रस्त्याची प्रचंड दुर्दशा होऊन प्रवासी वाहतुकीस रस्ता धोकादायक झाल्याने अखेर त्या रस्त्यावरून एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली तर दुसऱ्या व दूरच्या मार्गाने एसटी वाहतूक वळविल्याने प्रवाशांना प्रत्येक फेरीमागे चार रू. चा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एसटीपाठोपाठ सहा आसनी रिक्षांचाही मार्ग बदलल्याने हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत.सातपाटी, खारेकुरण व मुरबे या गावातून हजारो कामगार, कर्मचारी व नागरिक तारापूर एम.आय.डी. सी. मध्ये कामानिमित्त तसेच मुुंबई व पालघर, डहाणूकडे जाण्याकरिता बोईसर रेल्वे स्थानकापर्यंत जाण्या-येण्याकरिता बोईसर-मुरबे रस्त्यावरून धावणाऱ्या एसटी व सहा आसनी रिक्षांचा आधार घेत असतात. बोईसर कुंभवली मार्गे ५४ तर बोईसर मेहेर नाका मार्गे २४ अशा एकूण ७८ एसटीच्या फेऱ्या प्रतिदिन पहाटे ते रात्रीपर्यंत सुरू असतात.बोईसर कुंभवली मुरबे मार्गाचे अंतर १२ कि.मी असून एसटी भाषेत ते दोन स्टेजचे अंतर आहे, तर आता कुंभवली मार्गे बस बंद केल्याने मेहेर नाका-आलेवाडी-नांदगाव मार्गे मुरबे बसची वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून हे अंतर १६ किमी आहे. त्यामुळे अर्धा स्टेजचे अंतर वाढल्याने एसटी व्यवस्थापनाला तिकीट दर बाराऐवजी सोळा रु. घ्यावा लागत आहे.