'पद्मावत' सिनेमाचे ट्रेलर्स लीक, तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 06:11 PM2018-01-19T18:11:40+5:302018-01-19T18:11:58+5:30
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व रिलीज पूर्वीच वादात सापडलेल्या पद्मावत सिनेमाला काही लोकांनी विरोध केला, असला तरी हा सिनेमा पाहण्यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. पद्मावत या सिनेमाचे दोन नवीन ट्रेलर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व रिलीज पूर्वीच वादात सापडलेल्या पद्मावत सिनेमाला काही लोकांनी विरोध केला, असला तरी हा सिनेमा पाहण्यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. पद्मावत या सिनेमाचे दोन नवीन ट्रेलर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेले ट्रेलर्स अनऑफिशियल असून एका चाहत्यांने ते शेअर केले आहेत. एका ट्रेलरमध्ये प्रमुख अभिनेत्री दीपिका पादुकोण काही संवाद साधताना दिसत आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाला अनेक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तसेच, पद्मावत सिनेमा प्रदर्शित करण्यास विविध राज्यांतील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. देशातील चार राज्यांनी पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. दरम्यान, या बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असून येत्या 25 जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे.
Padmavati has never feared anything in her life!! #Padmaavat latest promo featuring @deepikapadukone's outstanding dialogue is a Classic in itself. The film arrives in your & everyone's close theatres the upcoming Thursday. Be ready to witness The Magic of Sanjay Leela Bhansali! pic.twitter.com/FMFMV1ZHO5
— Rahul Raut (@Rahulrautwrites) January 19, 2018
'पद्मावत' सिनेमा सर्व राज्यांमध्ये होणार प्रदर्शित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
पद्मावत सिनेमा प्रदर्शित करण्यास विविध राज्यांतील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तब्बल चार राज्यांनी पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. 25 जानेवारीला पद्मावत सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चार राज्यांकडून पद्मावत सिनेमावर लावण्यात आलेली बंदी घटनाबाह्य असल्याचंही कोर्टानं सांगितले. वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी निर्मात्यांची बाजू कोर्टासमोर मांडली. साळवे यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्डकडून संपूर्ण देशाला सिनेमा प्रदर्शित करण्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. अशात काही राज्यांनी सिनेमावर लावलेली बंदी ही घटनाबाह्य आहे. ही बंदी हटवण्यात यावी, अशी विनंती करत साळवेंनी निर्मात्यांची बाजू कोर्टासमोर मांडली.
And here is yet another latest classic promo of #Padmaavat. This features @RanveerOfficial aka Alauddin Khilji and gives us the glimpse of Ranveer's power-packed performance that we are going to experience in this magnum opus from 25th January onwards worldwide. pic.twitter.com/GjeCMhlUsD
— Rahul Raut (@Rahulrautwrites) January 19, 2018
पद्मावत एक 'मनहूस' चित्रपट, वेळ आणि पैसा वाया घालवू नका - असदुद्दीन ओवेसी
नवी दिल्ली - पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी विविध संघटना आणि नेत्यांकडून या चित्रपटाला असणारा विरोध कायम आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी अद्यापी दूर झालेल्या नाहीत. आता एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पद्मावत चित्रपटाच्या विरोधात मतप्रदर्शन केले आहे.
पद्मावत एक बकवास, मनहूस चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट पाहण्यात वेळ घालवू नका असे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केले आहे. राजपूत राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यातील संघर्षावर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. बुधवारी रात्री वारंगल शहरात जाहीरसभेला संबोधित करताना ओवेसी यांनी हे विधान केले. खासकरुन त्यांनी मुस्लिम तरुणाईला पद्मावत चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले. हा चित्रपट पाहून तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका असे ते म्हणाले.