मुंबई : रेल्वे अपघात हा प्रवाशांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण हे वाढतच आहे. गुरुवारी रेल्वे अपघातांचा तर उच्चांकच गाठला गेला. या दिवशी तब्बल २८ प्रवाशांचे अपघात झाले. यामध्ये बोरीवली स्थानकात सहा प्रवाशांचे अपघात झाल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. रेल्वे पोलिसांनी ठरवून दिलेल्या सरासरीनुसार दिवसाला अकरा प्रवाशांचे अपघात होतात. मात्र सरासरीपेक्षा सर्वाधिक अपघात होत असल्याचे समोर येत आहे. २६ मार्चच्या दिवशी २८ प्रवाशांचे अपघात झाले. यामध्ये ९ प्रवासी ठार तर १९ प्रवासी जखमी झाले. यामध्ये सर्वाधिक अपघात बोरीवली स्थानकात झाले असून एक प्रवासी ठार तर ५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यानंतर सीएसटी स्थानकात चार, डोंबिवली आणि वडाळा स्थानकात प्रत्येकी तीन प्रवाशांचे अपघात झाले असून ऊर्वरीत अन्य स्थानकांवर अपघात असल्याचे सांगण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे अपघातांमध्ये पुरुष प्रवाशांचे सर्वाधिक अपघात असून ९ पुरुष ठार तर १५ पुरुष जखमी आहेत. २६ मार्चला झालेल्या अपघातांचा तपशीलपोलीस ठाणेमृत्यूजखमीसीएसटी१३दादर-१ठाणे११डोंबिवली१२कल्याण-१कर्जत१-वडाळा१२वाशी-१पनवेल१-चर्चगेट१-वांद्रे१-अंधेरी-१बोरीवली१५वसई-२
रेल्वे अपघाताचा उच्चांक
By admin | Published: March 28, 2015 12:37 AM