गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही, चौकशीदरम्यान करतोय नारेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 07:39 AM2023-08-02T07:39:22+5:302023-08-02T07:39:53+5:30

आरोपी चेतन सिंहची चौकशी सुरू आहे.

train firing four people murder accused rpf constable not cooperating in investigation | गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही, चौकशीदरम्यान करतोय नारेबाजी

गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही, चौकशीदरम्यान करतोय नारेबाजी

googlenewsNext

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनला सात दिवसांच्या सरकारी रेल्वे पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे, पण तो चौकशीत सहकार्य करत नाही. या संदर्भात आरोपी चेतन सिंहची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तो तपासात सहकार्य करत नाही आणि गोळीबाराशी संबंधित प्रश्न विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देतो. 

जुनी पेन्शन योजना नाहीच! दबावापुढे झुकण्यास केंद्र सरकारचा नकार

याशिवाय पोलीस कोठडीत असताना त्याने घोषणाबाजीही केली. आरोपी चेतनला मंगळवारी मुंबईतील बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले, तेथे पोलिसांनी आरोपीला १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीच्या वकिलांनी आरोप केला की घटनेनंतर २४ तासांपेक्षा जास्त काळ त्याला जेवण दिले नाही.

आरोपीच्या वकिलाने सांगितले की, "माझ्या अशिलाने काहीही चुकीचे केलेले नाही. त्याने सांगितले की, त्याने जे काही केले ते सर्व्हिस गनने केले आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. त्याला २४ तासांपेक्षा जास्त वेळ जेवण दिले नाही.", त्यावर कोर्टाने निर्देश दिले आहेत. पोलिसांनी चेतनला वेळेवर जेवण द्यावे. चेतन मानसिकदृष्ट्या अस्थिर होता का, याचा तपास सुरू आहे.

रेल्वेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत आतापर्यंत १५ हून अधिक जणांचे जबाब घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले, त्यात पोलीस अधिकारी आणि ट्रेनमधील प्रवाशांच्या जबाबांचा समावेश आहे.

आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने सोमवारी महाराष्ट्रातील पालघर स्थानकाजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढलेल्या आपल्या वरिष्ठ आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. पालघरमधील नालासोपारा येथील रहिवासी अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (४८) आणि बिहारमधील मधुबनी येथील असगर अब्बास शेख (४८) अशी दोन मृत प्रवाशांची रेल्वे पोलिसांनी ओळख पटवली आहे, तर तिसऱ्ची अजुनही ओळख पटलेली नाही. या घटनेनंतर प्रवाशांनी ट्रेनची चेन खेचली असता ट्रेन मीरा रोड स्थानकाजवळ थांबली. त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शस्त्रांसह अटक करण्यात आली.

Web Title: train firing four people murder accused rpf constable not cooperating in investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.