मुंबई : रेल्वे गाडीत आणि स्थानकांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी प्रवासी नेहमी तक्रारींचा पाढा वाचताना दिसतात. कधी खाद्यपदार्थांचा दर्जा, कधी किंमत तर कधी त्यांच्या वैैधतेविषयी साशंकता व्यक्त केली जाते. मात्र, प्रवाशांच्या या तक्रारीवर कायमचा उपाय म्हणून रेल्वेने खाद्यपदार्थांच्या पाकिटावर ‘क्यू आर’ कोड लावण्यास सुरुवात केली आहे.इंडियन रेल्वे टूरिजम अॅण्ड कॅटरिंग कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या वतीने मुंबई सेंट्रल टर्मिनस येथील प्रमुख स्वयंपाकगृहात क्यू आर कोड सुविधा सुरू केल्यानंतर नुकतीच सीएसएमटी स्थानकातील प्रमुख स्वयंपाकगृहातही ती सुरू करण्यात आली. या सुविधेद्वारे प्रवाशांना पाकीटबंद पदार्थाचा दर्जा, गुणवत्ता आणि किंमत तपासता येणार आहे.सुरक्षित अन्न मिळणार‘क्यू आर कोड’चा वापर करून खाद्यपदार्थाचा दर्जा, गुणवत्ता आणि निश्चित किंमत कळणार असल्यामुळे प्रवाशांना सुरक्षित अन्न मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय क्यू आर कोडद्वारे एखाद्या पदार्थाची गुणवत्ता किंवा किमतीमध्ये तफावत आढळल्यास याबाबत संबंधित अधिकाºयाकडे तक्रार करता येणार असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे प्रवाशांना तपासता येणार खाद्यपदार्थांची गुणवत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 1:04 AM