रेल्वे प्रवाशांचे साहित्य एक दिवस आधीच पोहोचणार; तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नवीन योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:56 AM2019-11-01T01:56:07+5:302019-11-01T01:56:45+5:30
एक्स्प्रेसच्या प्रवासात साहित्य सोबत घेऊन फिरणे खूप जिकिरीचे आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर एक दिवस आधीच प्रवाशांचे साहित्य इच्छितस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे सुरू आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नवीन योजना आखण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांचे साहित्य एक दिवस आधीच विमानातून इच्छितस्थळी पाठविण्याची सुविधा आयआरसीटीसीने उपलब्ध केली.
एक्स्प्रेसच्या प्रवासात साहित्य सोबत घेऊन फिरणे खूप जिकिरीचे आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर एक दिवस आधीच प्रवाशांचे साहित्य इच्छितस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे सुरू आहे. हे साहित्य विमानाद्वारे पाठविले जाईल. ही सुविधा मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेससाठी असेल. ही एक्स्प्रेस १० नोव्हेंबरपासून खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेनुसार एका किलोकरिता प्रवाशाला १०० रुपये दर आकारण्यात येईल, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासन घेणार बिझनेसचे धडे
भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बिझनेसविषयीचे ज्ञान वाढविण्यासाठी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस यांचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी, तांत्रिकदृष्ट्या आधुनिकीकरण करण्यासाठी उपयोग होणार आहे, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे. स्पर्धात्मक युगात भारतीय रेल्वेनेदेखील स्पर्धात्मक राहिले पाहिजे. यासाठी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस यांच्याशी करार केला आहे. त्यामुळे भविष्यात उपयोगी ठरणाºया आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले पाहिजे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यांच्याकडून सांगण्यात आले. त्यासाठीच ही योजना आहे.