मुंबई : गेल्या तीन महिन्यांत मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोसारखे आजार बळावले आहेत. या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात साथीचे आजार वाढण्याचा धोका असल्याने, प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी कीटक नियंत्रण खात्याला दिले आहेत.पावसाळ्यात दरवर्षी साथीच्या रुग्णांची संख्या वाढते. गेल्या महिन्यात मरिन लाइन्स, भायखळा, परळ, धारावी, प्रभादेवी, दादर, कुर्ला, चेंबूर, गोवंडी या भागात डेंग्यू, हिवताप यांचे रुग्ण तुलनेने अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. पावसाळा संपत आल्यानंतर, या आजारांचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन, अग्निशमन याबाबत नागरिकांना जसे थेट प्रशिक्षण देण्यात येते. त्याच धर्तीवर डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधासाठी कोणती काळजी कशा प्रकारे घेणे आवश्यक आहे?याबाबत नागरिकांना प्रशिक्षण देण्याचे आदेश आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीत शनिवारी दिले. विशेष करून झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत....अशी घ्यावी खबरदारीझोपडपट्ट्यांमध्ये पावसाळ्यात लावण्यात येणाºया ताडपत्रीत, पाणी साठविण्याच्या पिंपात मोठ्या प्रमाणात अशा डासांची उत्पत्ती होते. हे लक्षात घेऊन ताडपत्री शक्यतो न लावणे व लावणे गरजेचे असल्यास त्यात पाणी साचू देऊ नये.पाणी साठविण्याच्या पिंपामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी ते आठवड्यातून एक दिवस कोरडे ठेवणे व पिंपाचे तोंड स्वच्छ कापडाने घट्ट बांधणे.झाडांच्या कुंड्यांखाली पाणी जमा होणाºया ताटल्या न ठेवणे, शोभेच्या वस्तूंमध्ये किंवा शोभेच्या झाडांमध्ये असणारे पाणी दररोज बदलणे, आपल्या सोसायटीच्या - कार्यालयाच्या व घराच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे.
झोपडपट्ट्यांमध्ये आजार प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रशिक्षण द्या! - आयुक्तांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 3:22 AM