Join us

रेल्वेचे पंप ठरले कुचकामी, सुमारे १ हजार ७०० लोकल फेऱ्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 6:55 AM

मध्य रेल्वे मार्गावरील विक्रोळी ते कांजूरमार्ग या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली.

मुंबई : रेल्वे प्रशासनाने यावर्षी रेल्वे रुळंवर पाणी साचू नये, यासाठी पंपाची व्यवस्था केली होती. यासह अनेक उपाययोजना केल्या होत्या. मात्र तरीही बुधवारी रेल्वे रुळंवर पाणी साचले. त्यामुळे रेल्वेचे पंप कुचकामी असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

मध्य रेल्वे मार्गावरील विक्रोळी ते कांजूरमार्ग या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. मध्य रेल्वे मार्गात पाणी साचू नये म्हणून रेल्वे प्रशासानाने यावर्षी एकूण १० ते १२ मोठ्या पंपासह ७९ पंप मशीन बसविले. मात्र तरीदेखील पाणी साचण्याच्या घटना घडल्या. कुर्ला, सायन, माटुंगा भायखळा या स्थानकांजवळ नालेसफाई, रेल्वे रुळ मार्ग सफाई करूनही येथे पाणी साचले. जूनमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाबाहेर पाणी साचण्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा बुधवारी याच परिसरात पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. मध्य रेल्वे प्रशासनाने आतातरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.सुमारे १ हजार ७०० लोकल फेऱ्या रद्दमध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पाणी साचल्याने सुमारे १ हजार ७०० फेºया रद्द करण्यात आल्या. यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. तर, तिन्ही मार्गांवरून प्रवाशांसाठी विशेष लोकल सेवा चालविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

टॅग्स :रेल्वेमुंबईलोकल