गुज्जर आंदोलनामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:06 AM2019-02-13T02:06:25+5:302019-02-13T02:06:40+5:30

गुज्जर आंदोलनाने ९ फेब्रुवारीपासून तीव्र स्वरुप धारण केले आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्ते, लोहमार्ग सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे १७ फेब्रुवारीपर्यंतचे मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे.

 The train schedules collaps due to the Gujjar agitation | गुज्जर आंदोलनामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

गुज्जर आंदोलनामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

googlenewsNext

मुंबई : गुज्जर आंदोलनाने ९ फेब्रुवारीपासून तीव्र स्वरुप धारण केले आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्ते, लोहमार्ग सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे १७ फेब्रुवारीपर्यंतचे मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. हे आंदोलन असेच सुरूच राहिल्यास १७ फेब्रुवारीनंतर मेल, एक्सप्रेस रद्द किंवा मार्गात बदल होण्याची शक्यता आहे.

१४ फेब्रुवारी रोजी गाडीच्या मार्गात बदल
वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेस रतलाम-चंदेरिया-जयपूर-बांदीकुई-भरतपूर अशी चालविण्यात येणार आहे.
वांद्रे टर्मिनस- श्री माता वैष्णो देवी कातरा एक्स्प्रेस नागदा-संत हिरदाराम नगर-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.
वांद्रे टर्मिनस- हजरत निजामुद्दीन गरीब रथ एक्स्प्रेस नागदा-संत हिरदाराम नग-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.
नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल राजधानी एक्सप्रेस नागदा-संत हिरदाराम नगर-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.
मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस नागदा-संत हिरदाराम नगर-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.
मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल मेल नागदा-संत हिरदाराम नगर-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.

१४ फेब्रुवारीला या गाड्या रद्द
वांद्रे टर्मिनस-मुजफ्फरपुर अवध एक्स्प्रेस
वांद्रे टर्मिनस-डेहराडून एक्स्प्रेस
डेहराडून-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस
हरिद्वार-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस
मुंबई सेंट्रल-फिरोझपूर जनता एक्स्प्रेस
मंदसौर-केटा-मेरठ सिटी एक्स्प्रेस
इंदौर-नवी दिल्ली एक्सप्रेस

१५ फेब्रुवारी या गाड्या रद्द
डेहराडून-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस

१६ फेब्रुवारी या गाड्या रद्द
फिरोझपूर-मुंबई सेंट्रल जनता एक्स्प्रेस
अमृतसर-वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्स्प्रेस

१७ फेब्रुवारी या गाड्या रद्द
मुजफ्फरपुर- वांद्रे टर्मिनस अवध एक्सप्रेस

Web Title:  The train schedules collaps due to the Gujjar agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे