Join us

गुज्जर आंदोलनामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 2:06 AM

गुज्जर आंदोलनाने ९ फेब्रुवारीपासून तीव्र स्वरुप धारण केले आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्ते, लोहमार्ग सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे १७ फेब्रुवारीपर्यंतचे मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे.

मुंबई : गुज्जर आंदोलनाने ९ फेब्रुवारीपासून तीव्र स्वरुप धारण केले आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्ते, लोहमार्ग सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे १७ फेब्रुवारीपर्यंतचे मेल, एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. हे आंदोलन असेच सुरूच राहिल्यास १७ फेब्रुवारीनंतर मेल, एक्सप्रेस रद्द किंवा मार्गात बदल होण्याची शक्यता आहे.१४ फेब्रुवारी रोजी गाडीच्या मार्गात बदलवांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेस रतलाम-चंदेरिया-जयपूर-बांदीकुई-भरतपूर अशी चालविण्यात येणार आहे.वांद्रे टर्मिनस- श्री माता वैष्णो देवी कातरा एक्स्प्रेस नागदा-संत हिरदाराम नगर-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.वांद्रे टर्मिनस- हजरत निजामुद्दीन गरीब रथ एक्स्प्रेस नागदा-संत हिरदाराम नग-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल राजधानी एक्सप्रेस नागदा-संत हिरदाराम नगर-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस नागदा-संत हिरदाराम नगर-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल मेल नागदा-संत हिरदाराम नगर-बीना-आग्रा अशी चालविण्यात येणार आहे.१४ फेब्रुवारीला या गाड्या रद्दवांद्रे टर्मिनस-मुजफ्फरपुर अवध एक्स्प्रेसवांद्रे टर्मिनस-डेहराडून एक्स्प्रेसडेहराडून-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसहरिद्वार-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसमुंबई सेंट्रल-फिरोझपूर जनता एक्स्प्रेसमंदसौर-केटा-मेरठ सिटी एक्स्प्रेसइंदौर-नवी दिल्ली एक्सप्रेस१५ फेब्रुवारी या गाड्या रद्दडेहराडून-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस१६ फेब्रुवारी या गाड्या रद्दफिरोझपूर-मुंबई सेंट्रल जनता एक्स्प्रेसअमृतसर-वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्स्प्रेस

१७ फेब्रुवारी या गाड्या रद्दमुजफ्फरपुर- वांद्रे टर्मिनस अवध एक्सप्रेस

टॅग्स :रेल्वे