रेल्वे प्रवासात दुखापत ? तत्काळ मिळणार मदत, ‘मध्य रेल्वे’चा ३३ रुग्णालयांशी करार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:43 AM2023-10-31T11:43:07+5:302023-10-31T11:44:29+5:30
कोणत्या स्थानकांवर सध्या कक्ष सुरू, जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेच्या १७ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आहे; परंतु या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या काही प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत अपघातग्रस्त प्रवाशांच्या तत्काळ उपचार मिळावे यासाठी मध्य रेल्वेने ३३ रुग्णालय, नर्सिंगहोमसोबत करार केला आहे. १७ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र या कक्षात डॉक्टर तसेच आपत्कालीन साहित्य उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या.
कोणत्या स्थानकांवर सध्या कक्ष सुरू?
दादर, भायखळा, सीएसएमटी, वडाळा, घाटकोपर, कुर्ला, पुणे, नागपूर, जळगाव, भुसावळ, अकोला इत्यादी.
प्राथमिक उपचार रेल्वेकडून मोफत
एखादा अपघात घडल्यास तत्काळ या कक्षात प्रवाशाला प्राथमिक उपचार रेल्वे प्रशासनाकडून मोफत देण्यात येणार असून, त्यापुढील खर्च रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांना करावा लागणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.
सर्व रेल्वेस्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारणे शक्य नसून विविध स्थानकांवर सर्वेक्षण सुरू आहे. प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेत आवश्यक वैद्यकीय उपचार तत्काळ मिळावे यासाठी रुग्णालय, नर्सिंगहोमशी करार केेले जात आहेत.
- रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे