ख्रिश्चन कर्मचाऱ्यांना गुड फ्रायडेऐवजी २० तारखेला प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 05:09 AM2019-04-18T05:09:46+5:302019-04-18T05:10:38+5:30
गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यावर असणा-या ख्रिस्ती कर्मचाऱ्यांना १८ एप्रिलच्या प्रशिक्षणास अनुपस्थित राहण्याची परवानगी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली
Next
मुंबई : गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यावर असणा-या ख्रिस्ती कर्मचाऱ्यांना १८ एप्रिलच्या प्रशिक्षणास अनुपस्थित राहण्याची परवानगी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली असून मुंबई शहर जिल्ह्याबाबत असा निर्णय होण्याची शक्यता आहे.
निवडणूक कामावरील कर्मचाºयांसाठी उपनगर कार्यालयाने १८ आणि १९ एप्रिलला प्रशिक्षण आयोजित केले आहे. मात्र, १९ एप्रिलला गुड फ्रायडे असून असल्याने ख्रिश्चन संघटना आणि कर्मचाºयांनी त्याला आक्षेप घेतला. ही बाब लक्षात घेत ख्रिस्ती कर्मचाºयांना शुक्रवार २० एप्रिल, २०१९ रोजी प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.