महाराष्ट्राच्या धर्तीवरच डॉक्टरांना प्रशिक्षण, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती,  कार्यक्रमाचे आयोजन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:05 AM2017-12-03T00:05:12+5:302017-12-03T00:05:21+5:30

महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तम दर्जाचे आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्रातील धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन गुरुवारी उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंग यांनी केले.

Training of doctors on the lines of Maharashtra, Uttar Pradesh's Health Minister's information and programs are organized | महाराष्ट्राच्या धर्तीवरच डॉक्टरांना प्रशिक्षण, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती,  कार्यक्रमाचे आयोजन करणार

महाराष्ट्राच्या धर्तीवरच डॉक्टरांना प्रशिक्षण, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती,  कार्यक्रमाचे आयोजन करणार

Next

मुंबई : महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तम दर्जाचे आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्रातील धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन गुरुवारी उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंग यांनी केले.
लोअर परेल येथे हार्वर्ड जागतिक आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य क्षेत्रातील आव्हान, सुधारणा आदी विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उत्तर प्रदेश सरकारने शहरी आणि ग्रामीण आरोग्य सेवेकडे गांर्भीयपूर्वक लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार आरोग्य विषयक सुधारणा केल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा दिल्या जात आहेत. तसेच राज्यात डॉक्टरांच्या निवृत्तीमुळे रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीतून नियुक्त झालेल्या डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाºया प्रशिक्षण कार्यक्रमाचा अवलंब केला जाणार आहे, असे सिंग यांनी चर्चासत्रात बोलताना सांगितले.
या चर्चासत्राला मुंबईतील जागतिक दर्जाच्या रुग्णालयांचे प्रतिनिधी, आरोग्य संस्था, औषध निर्माण कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उत्तर प्रदेशात सार्वजनिक वाहतूक सुविधा, रेल्वे सेवा, रस्ते आणि विमान सेवा आदी सुविधा झपाट्याने निर्माण केल्या जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एका परिषदेचेही आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Training of doctors on the lines of Maharashtra, Uttar Pradesh's Health Minister's information and programs are organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर