ठाणो : प्रशिक्षण अर्धवट, मात्र कोर्सची संपूर्ण फी घेऊन ग्राहकांची फसवणूक करणा:या तिरुपती नाईक आणि राजेश ङिानजुरडे यांना कोर्सची फी आणि नुकसानभरपाई मिळून विद्याथ्र्याला 19 हजार 915 परत करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.
ठाण्यातील लक्ष्मीकांत माळगावकर हे कॉम्प्युटर सायन्सचा समकक्ष कोर्स करत होते. एका वृत्तपत्रत सॉफ्टवेअर टेस्टिंग ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट या मथळ्याखाली नोकरभरतीसाठी आलेली जाहिरात पाहून त्यांनी चौकशी केली. त्यांना राजेश ङिानजुरडे आणि तिरुपती नाईक यांनी नोकरीची हमी दिली. त्यानुसार, सुमारे 12 हजार देऊन त्यांनी कोर्ससाठी प्रवेश घेतला. मात्र, 1क्क् तासांचा कोर्स त्यांनी 7क् तासच घेतला. ऑटोमेशन टेस्टिंग, लाइव्ह प्रोजेक्ट तसेच कोर्स पूर्ण झाल्यावर परीक्षा घेतली नाही. एकंदरीतच जाहिरातीत दिल्याप्रमाणो प्रशिक्षण न देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे कोर्सची फी आणि नुकसानभरपाई आपल्याला परत मिळावी, या मागणीसह माळगावकर यांनी ग्राहक मंचाकडे त्यांच्याविरोधात तक्रार नोंदविली.
कागदपत्रे, घटना यांची पडताळणी केली असता नोकरीची हमी दिल्यामुळे माळगावकरांनी 12 हजार फी भरून प्रवेश घेतला होता. मात्र जाहिरातीत, माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणो सुरुवातीपासूनच कोर्स पूर्ण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटने केली नाही, असे मंचाने स्पष्ट केले. याबाबत, माळगावकर यांनी नाईक आणि राजेश ङिानजुरडे यांना वेळोवेळी विचारणा केली. मात्र, त्यालाही उत्तर दिले नाही. तर परीक्षा न घेता कोर्स संपल्याचे जाहीर करून इन्स्टिटय़ूटने त्यांची फसवणूक केली आहे, असे सांगितले. त्यामुळे कोर्सची फी आणि नुकसानभरपाई मिळून माळगावकर यांना 19 हजार 915 इतकी रक्कम द्यावी, असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)