विद्यार्थी, पोलिसांना मन:शांतीसाठी प्रशिक्षण

By admin | Published: December 26, 2016 05:50 AM2016-12-26T05:50:41+5:302016-12-26T05:50:41+5:30

बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांवरचा ताण वाढून मानसिक शांतता कुठेतरी हरवत चालली आहे. देशाचे भविष्य असणाऱ्या लहान मुलांवरही आजकाल

Training for peace of mind, students, police for students, police | विद्यार्थी, पोलिसांना मन:शांतीसाठी प्रशिक्षण

विद्यार्थी, पोलिसांना मन:शांतीसाठी प्रशिक्षण

Next

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांवरचा ताण वाढून मानसिक शांतता कुठेतरी हरवत चालली आहे. देशाचे भविष्य असणाऱ्या लहान मुलांवरही आजकाल अभ्यासाचा ताण वाढलेला आहे. तर, दुसरीकडे संरक्षणार्थ २४ तास आॅन ड्युटी असणाऱ्या पोलिसांवरचाही ताण वाढला आहे. विद्यार्थी आणि पोलिसांना मानसिक शांतता मिळण्यासाठी समाजप्रबोधक वामनराव पै प्रणीत जीवनविद्या मिशन या संस्थेतर्फे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
मिशनच्या कार्याची शासनस्तरावर सर्वप्रथम दखल पोलीस खात्याने घेतली आहे. पोलिसांचे मानसिक सबलीकरण, व्यसनाधीन होऊ नये म्हणून जनजागृती आणि तणावाचे नियोजन यासाठी जीवनविद्या मिशनचे कोर्सेस जुलै २०१६पासून सुरू करण्यात आले आहेत. या कोर्सेसमध्ये आतापर्यंत दोन ते तीन हजार पोलीस सहभागी झाले आहेत. याच उपक्रमांतर्गत २० डिसेंबरला मरोळ पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत व्यसन किती घातक आहे, निरोगी आयुष्य निरोगी मनासाठी किती उपयुक्त आहे, याची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला ७०० पोलीस शिपायांनी हजेरी लावली होती. जीवनविद्येच्या कार्यशाळेमुळे मानसिक परिवर्तन घडून आले. जीवनाचे व्यवस्थापन शिकवणारी सर्वाेत्कृष्ट कार्यशाळा, असे मत पोलिसांनी व्यक्त केले. पोलिसांप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी ‘उत्कर्ष विद्यार्थ्यांचा, संकल्प जीवनविद्येचा’ या संकल्पनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. २० डिसेंबरला बोरीवली येथील नालंदा रात्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी साडेतीन तासांचा विद्यार्थी कोर्स आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांनी शिक्षणात प्रगती कशी करावी हे सांगतानाच अभ्यासाचे तंत्र सोप्या भाषेत समजावून देण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन जयश्री जयकर आणि नालंदा रात्रशाळेचे मुख्याध्यापक बोरवले यांनी केले होते. विद्यार्थ्यांना मिशनच्या व्याख्यात्या आशा राणे आणि भक्ती देसाई यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
पोलीस आहेत म्हणून आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. पोलीस दिवसरात्र तैनात असतात. यामुळे पोलिसांप्रति कृतज्ञता म्हणून जीवनविद्या मिशन विनामूल्य सेवा देत आहे. - प्रल्हाद पै,
आजीव विश्वस्त, जीवनविद्या मिशन

Web Title: Training for peace of mind, students, police for students, police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.