Join us

विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शनासाठी एफसी सेंटर्सवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 4:34 AM

आता महाविद्यालयांसोबत संवाद कार्यशाळांच्या २ टप्प्यांनंतर एफसी सेंटरवरील कर्मचा-याच्या प्रशिक्षणाकडे सेलने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

मुंबई : यंदाच्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी सीईटी सेलने कंबर कसली असून आता महाविद्यालयांसोबत संवाद कार्यशाळांच्या २ टप्प्यांनंतर एफसी सेंटरवरील कर्मचा-याच्या प्रशिक्षणाकडे सेलने आपले लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत आणि अर्जांपासून ते परीक्षेला उपस्थित राहण्यापर्यंत सीईटीची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुलभ व्हावी हा उद्देश समोर ठेवून सीईटी सेल यंदा प्रयत्न करत असल्याची माहिती सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली.सीईटी प्रवेश प्रक्रियेची अर्ज भरण्यापासूनची प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सीईटी सेलमार्फत राज्यात एफसीची (फॅसिलिटेशन सेंटर) व्यवस्था केली असून त्यांची राज्यातील संख्या १ हजार ७३ इतकी आहे. विद्यार्थ्यांना अनेकदा अर्ज कसा आणि कुठे भरावा, कागदपत्रांची पडताळणी, कागदपत्रे यासंदर्भात अडचणी येतात. मात्र अनेकदा एफसी सेंटर्सवरील कर्मचाऱ्यांनाही पुरेशी आणि योग्य माहिती नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. याउलट विद्यार्थ्यांना या प्राक्रियांबाबत योग्य आणि अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी या सेंटरवरील कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्याचा सेलचा मानस असल्याची माहिती कदम यांनी दिली. याच अनुषंगाने शासकीय संस्थेत असलेल्या एआरसी सेंटरची ही संख्या वाढवण्याबाबतचा विचार चालू असल्याची माहितीही त्यांनी दिली.>इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी, हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाºया एमएचटी सीईटी परीक्षेला दरवर्षी राज्याबाहेरून अनेक विद्यार्थी नोंदणी करतात. त्यांना परीक्षा देण्यास महाराष्ट्रात यावे लागते. त्यामुळे पडणारा ताण कमी करण्यासाठी यंदा एमएचटी सीईटीची परीक्षा राज्याबाहेरही घेण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. ही परीक्षा कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या १० राज्यांमध्ये घेण्यात येणार आहे.