लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून प्रशासन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. त्यानुसार नुकतेच २५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या सिटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पहिल्या बॅचला प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार मेट्रोच्या गरजांना अनुसरून हा प्रोग्राम तयार करण्यात आला. मेट्रो स्थानकांमध्ये आरोग्यविषयक, आगीसारख्या आपत्ती उद्भवल्यास त्यावर प्रथमोपचार, अग्निशमन उपाययोजनांसह प्रतिसाद देण्यासाठी कर्मचारी तयार असून, यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आगी लागण्याचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यात पाणी साचून मुंबईतील सेवा प्रत्येक पावसाळ्यात बंद पडत असतात. परिणामी, याचा विचार करीत मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
..........................................