हेल्थ केअर सेवांबाबत राज्यातील साडेदहा हजार तरुणांना प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 05:29 AM2020-04-26T05:29:30+5:302020-04-26T05:29:49+5:30
मेडिकल, नर्सिंग व हेल्थ केअर सेक्टरमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांत आतापर्यंत १०,८१५ युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविले आहे.
Next
मुंबई : राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मेडिकल, नर्सिंग व हेल्थ केअर सेक्टरमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांत आतापर्यंत १०,८१५ युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविले आहे.
कोरोना नियंत्रणात आरोग्य सेवकांची असलेली मोठी गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने या युवक-युवतींची यादी आरोग्य विभागास तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. हेल्थ केअर सेक्टरमधील हे प्रशिक्षित उमेदवार असून गरजेनुसार त्यांच्या नियुक्तीबाबत विचार व्हावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.