मध्य रेल्वे कौशल विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:09 AM2021-08-29T04:09:09+5:302021-08-29T04:09:09+5:30
मुंबई : मध्य रेल्वेने प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत रेल कौशल विकास योजनांद्वारे विविध युनिटमध्ये तरुणांना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ...
मुंबई : मध्य रेल्वेने प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत रेल कौशल विकास योजनांद्वारे विविध युनिटमध्ये तरुणांना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल आयोजित केले आहेत. याबाबत रेल्वे मंत्रालयाने निर्देश दिले होते.
मध्य रेल्वेचे विशेष कार्यशाळा आणि पायाभूत प्रशिक्षण केंद्रे जसे माटुंगा आणि परळ वर्कशॉप, मुंबई, ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, नाशिक रोड, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप भुसावळ, इलेक्ट्रिक लोको शेड अजनी, नागपूर तसेच पुणे आणि सोलापूर येथील बेसिक ट्रेनिंग सेंटर यांनी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यास सुरुवात केली आहे. वर्ष २०२१-२२ साठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विनाशुल्क प्रशिक्षण
वेल्डर, मशिनिस्ट, फिटर आणि इलेक्ट्रिशियन इत्यादी विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. ३० मुले/मुलींना प्रत्येक बॅचमध्ये लेखी आणि सरावसह प्राथमिक स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि ते पूर्णपणे मोफत आहे. किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि १८ ते ३५ वर्षे वयोमर्यादा राहील. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रशिक्षण तीन वर्षे म्हणजे २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ पर्यंत चालू राहील.