Join us

ट्रायचे २०२० चे वाहिनी दरपत्रक योग्य; १३० रुपयांत २०० वाहिन्या पाहणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 12:02 PM

१३० रुपयांत २०० वाहिन्या पाहणे शक्य

ब्रॉडकास्टर्सना अंशतः दिलासालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने गेल्यावर्षी जारी केलेले वाहिन्यांचे दरपत्रक वैध ठरवले. मात्र, त्यातील एक अट रद्द केली. या अटीनुसार, कोणत्याही चॅनेलच्या पॅकमधील एका वाहिनीची किंमत त्या पॅकमधील सर्वाधिक किमतीच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त असू शकत नाही. मात्र, न्यायालयाने ही अट रद्द करून ब्रॉडकास्टर्सना अंशतः दिलासा दिला.ट्रायने जानेवारी २०२० पासून टीव्ही सॅटेलाईट वाहिन्यांसाठी नवे सुधारित दर जाहीर केले. एका वाहिनीचे व वाहिन्यांच्या पॅकचे शुल्क किती असावे, याबाबतही ट्रायने मर्यादा आखली. विविध अटीशर्तीही लागू केल्या. गेल्यावर्षी १ मार्चपासून त्यावर अंमलबजावणी हाेणार होती. मात्र, संबंधित सुधारित दरपत्रकाला फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया व अन्य काही वाहिन्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. अमजद सय्यद व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने गेल्यावर्षी यावरील निर्णय राखून ठेवला. कोरोनामुळे निकाल जाहीर केला नव्हता. न्यायालयाने बुधवारी हा निकाल देऊन ट्रायला दिलासा दिला.

१३० रुपयांत २०० वाहिन्या पाहणे शक्य!

१ जानेवारी २०२० रोजीच्या ट्रायच्या निर्देशानुसार टीव्ही सॅटेलाईट वाहिनीच्या दरांवर निर्बंध टाकण्यात आले. नेटवर्क क्षमता शुल्क (एनसीएफ) १३० पर्यंत ठेवली. यामुळे ग्राहकांना फायदा होईल, दरात सुसूत्रीकरण येईल, असा ट्रायचा दावा आहे. यापूर्वी फ्री टू एअर वाहिन्यांसाठी १३५ रुपयांची मर्यादा होती. त्यापुढे पसंतीच्या वाहिनीसाठी विविध पॅकेज होते. आता १३० रुपयांत २०० वाहिन्या पाहणे शक्य असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे. मात्र, ट्रायचे हे निर्देश मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे आहेत, असे अनेक ब्रॉडकास्टर्सचे म्हणणे आहे. बुधवारी न्यायालयाने ब्रॉडकास्टर्सना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत देत तोपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश ट्रायला दिले.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्याउच्च न्यायालय