Join us  

गद्दारांना पक्षात थारा नाही

By admin | Published: October 13, 2014 10:50 PM

सत्तेसाठी आतूर असलेल्या महेंद्र दळवी यांना पक्षाने सर्व काही दिले, असे असताना काहीच मिळाले नाही, असे म्हणणा:या गद्दारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थारा नाही,

अलिबाग : सत्तेसाठी आतूर असलेल्या महेंद्र दळवी यांना पक्षाने सर्व काही दिले, असे असताना काहीच मिळाले नाही, असे म्हणणा:या गद्दारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थारा नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. 
अलिबाग- मुरुड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार महेश मोहिते यांच्या प्रचारासाठी तटकरे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अलिबाग येथे आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
शेकाप आता फक्त अलिबाग मतदार संघापुरताच मर्यादित राहिला आहे. रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप सोबत जाण्याचा निर्णय माङया एकटय़ाचा नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांचा होता, असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले. दळवी यांनीही शेकापसोबत जाण्याबाबत सुचविले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.विधानसभेच्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेच अंडरस्टँडिंग नसल्याने कार्यकत्र्यानी मनातील संभ्रम दूर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील आघाडी का तुटली, हा प्रश्न काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांनी पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना विचारावा. आघाडी झाली नसल्याने पक्षाला भूमिका घ्यावी लागली आहे. मधुकर ठाकूर यांच्यावर माझा राग नाही, असेही त्यांनी सांगून ठाकूर यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
अलिबागचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून होणो गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार अल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत असल्यानेच त्यांचे राष्ट्रीय नेते राज्यातील प्रचारात उतरले होते, अशी कडवी टीका त्यांनी केली. 
 अलिबाग शहरातून महेश मोहिते यांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, विजय कवळे, महेश मोहिते, अलिबाग तालुकाध्यक्ष ऋषीकांत भगत, दत्ता ढवळे, संतोष निगडे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.