Join us

गद्दार नहीं, खुद्दार है हम, रक्ताचे नसलो, तरी विचारांचे आम्ही वारसदार आहोत - धैर्यशील माने 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 9:12 PM

Dasara Melava : आमच्या मातोश्रीने जो स्वाभिमानाचा विचार दिला, तोच धागा घेऊन एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. 

मुंबई : दसऱ्यानिमित्त आज शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होत आहे. या बहुचर्चित एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार धैर्यशील माने यांनी भाषण केले. यावेळी आम्हाला गद्दार म्हणण्यात अर्थ नाही, गद्दार नही, खुद्दार है हम, रक्ताचे नसलो, तरी विचारांचे आम्ही वारसदार आहोत. तसेच, आमच्या मातोश्रीने जो स्वाभिमानाचा विचार दिला, तोच धागा घेऊन एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. 

बाळासाहेबांच्या विचाराशिवाय, व्यक्तीमत्वाशिवाय  शिवसेना अपुरी आहे. त्यांनी शिवसैनिकांना संधी देऊन मोठं केलं. लढण्याचे स्फुरण दिलं. आमच्या मातोश्रीने आम्हाला स्वाभिमानाचा विचार दिला, तोच धागा घेऊन एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. बाळासाहेबांच्या माघारी जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्याचे एकनाथ शिंदे करत आहेत, असे धैर्यशील माने म्हणाले.

बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही, तोच शिवसैनिक आज अडचणीत आहे. शिवसैनिक संपर्क अभियानातून आम्हाला शिवसैनिक अडचणी सांगू लागले होते. त्या शिवसैनिकाची अडचण कोणी ऐकायला तयार नव्हते. त्याचे ऐकण्याचे काम लोकनात एकनाथ शिंदे यांनी केले. ही लढाई तुमची आमची नसून गावागावात असलेल्या शिवसैनिकाची लढाई आहे, त्यासाठी एकनाथ शिंदे पुढे जात आहेत, असे धैर्यशील माने यांनी सांगितले.

याचबरोबर, धैर्यशील माने पुढे म्हणाले, जी शिवसेना बाळासाहेबाना अभिप्रेत होती, जी शिवसेना कुणाला बांधिलकी नव्हती, त्याची बांधिलकी फक्त बाळासाहेबांच्या विचाराची होती. हिंदुत्वाची होती. गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारे जेव्हा बाळासाहेब आमच्यातून निघून गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली तेव्हा प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेब समजू लागला, त्या शिवसैनिकांनी शिवसेना जिवंत ठेवली. या शिवसेनेचा धागा घेऊन आपण घरोघरी गेलं पाहिजे. बाळासाहेबांचा विचार बाजूला ठेवायचा नव्हता, स्वाभिमान बाजूला ठेवायचा नव्हता म्हणून एकनाथ शिंदेना शिवधनुष्य उचलावे लागले, असेही धैर्यशील माने म्हणाले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेदसराशिवसेना