दक्षिण मुंबई-नवी मुंबई जोडणारा ट्रान्स हार्बर दिव्यांनी उजळणार! १,२१२ खांब उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:51 PM2023-09-24T12:51:23+5:302023-09-24T12:51:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील प्रगतीचा द्योतक ठरणाऱ्या ...

Trans Harbor connecting South Mumbai-Navi Mumbai will be lit up with thousands of lights! 1,212 pillars will be erected | दक्षिण मुंबई-नवी मुंबई जोडणारा ट्रान्स हार्बर दिव्यांनी उजळणार! १,२१२ खांब उभारणार

दक्षिण मुंबई-नवी मुंबई जोडणारा ट्रान्स हार्बर दिव्यांनी उजळणार! १,२१२ खांब उभारणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहरांना जोडून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील प्रगतीचा द्योतक ठरणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची सद्यस्थितीत ९६.६० टक्के कामे पूर्ण झाली असून विद्युत खांबाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पात एकूण १२१२ विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी केली जाणार असून त्यातील २० % खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. या खांबांवरील विद्युत दिवे हे केंद्रीय नियंत्रण आणि देखरेख प्रणालीद्वारे नियंत्रित केले जातील. हे खांब सागरी क्षेत्रातील हवामानाच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या आव्हानावर मात करतील, अशा पद्धतीने निर्माण करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी केली असून, मुखर्जी यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा बारकाईने आढावा घेतला आणि प्रकल्पातील उर्वरित कामे गुणवत्तेसह झपाट्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

विद्युत खांबाचे वाढणार आयुष्य
विशेषतः खारट वातावरणात त्यांची उपयुक्तता, गंज-मुक्त पॉलीयुरेथेन लेप, गंज टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी गॅल्वनायझेशन, जोरदार वाऱ्याच्या वेगाशी सामना करण्यासारख्या आव्हानांना तोंड देणारी संरचनात्मक रचना आणि संपूर्ण पुलावर एकसमान प्रदीपन यांचा समावेश आहे.

पॅकेजमध्ये प्रकल्प विभागला गेला आहे. ज्यामध्ये ३ पॅकेज हे स्थापत्य कामांकरिता आहेत.

था पॅकेज हा इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सीस्टिम स्वयंचलित टोल कलेक्शन यंत्रणा आणि विद्युत कामांकरिता असल्याने तो इतर पॅकज प्रमाणेच विशेष महत्त्वाचा आहे.

मीटर लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले आहे.

जलद जोडणी
एमटीएचल प्रकल्प हा नवी मुंबईसह प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी जलद जोडणी प्रदान करण्याची क्षमता राखणारा आहे. 
अत्याधुनिक विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी सुरू असून, सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने प्रकल्प प्रगतिपथावर आहे.  

Web Title: Trans Harbor connecting South Mumbai-Navi Mumbai will be lit up with thousands of lights! 1,212 pillars will be erected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.