४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 06:46 AM2020-10-01T06:46:56+5:302020-10-01T06:48:22+5:30

बी.जे. शेखर नवी मुंबईचे अप्पर आयुक्त; मुंबईतील परिमंडळ एकचे उपायुक्त निशाणदार यांची नाशिकला बदली

Transfer of 150 senior police officers including 43 senior IPS officers | ४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

४३ वरिष्ठ आयपीएससह १५० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

मुंबई : पोलीस दलातील ४३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १५० वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या बुधवारी रात्री उशिरा करण्यात आल्या. यामध्ये राज्य राखीव दलातील उपमहानिरीक्षक बी.जे. शेखर यांची नवी मुंबईत गुन्हे अन्वेषण शाखेचे अपर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर, मुंबई परिमंडळ एकचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांची नाशिकला उपायुक्त (गुन्हे) पदी बदली करण्यात आली.

नवी मुंबईतील विशेष शाखेतील उपायुक्त सुरेश मेंगडे यांची परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर, पुणे एसआरपीएफचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची पुण्यात अप्पर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी मुंबईचे आयुक्त परमवीर सिंग यांनी ७ उपायुक्तांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. या बदल्यांमध्ये परिमंडळ एकचे उपायुक्त निशाणदार यांचाही समावेश होता. त्यावेळी त्यांना पूर्ववत परिमंडळ एकमध्येच ठेवण्यात आले होते. आज मात्र त्यांची नाशिक आयुक्तालयात गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली.
पोलिसांच्या बदल्यांबाबत ३० सप्टेंबर ही अखेरची मुदत देण्यात आली होती. मात्र आज एकूण १५० अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या असून अद्याप अप्पर महासंचालक, विशेष महानिरीक्षक दर्जाच्या तसेच कनिष्ठ स्तरावरील बदल्या प्रलंबित आहेत. त्यामुळे बदलीसाठीच्या कालावधीत १५ आॅक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली.

१५ जणांना नवे नियुक्ती पत्र दिले नाही
च्आज झालेल्या एकूण बदल्यांपैकी १२० अधिकारी हे उपअधीक्षक / सहाय्यक आयुक्त दर्जाचे आहेत.
च्त्यामध्ये १५ जणांची सध्याच्या ठिकाणाहून बदली केली आहे. मात्र त्यांना नवीन नियुक्ती दिलेले नाही. त्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येतील.


राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अधिकाऱ्यांचे नाव सध्याचे ठिकाण नवीन नियुक्तीचे ठिकाण
१. श्री. सचिन सावंत पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात सहायक पोलीस आयुक्त,नवी मुंबई
प्रमाणपत्र पडताळणी समिती, उस्मानाबाद
२. धनंजय ह. पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग, पुणे
३. सुहास भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर
४. प्रदीप मैराळे उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी, वर्धा. उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, धुळे.
५. प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, गोंदिया. सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर.
६. विवेक सराफ पोलीस उप अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण. सहायक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर.
७. पोपट रावजी यादव पोलीस उप अधीक्षक, लातूर. सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.
८. लक्ष्मण भोगण सहायक पोलीस आयुक्त, अमरावती. सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.
९. बलराज लंजिले उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगाखेड, परभणी. उप विभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर, लातूर.
१०. पौर्णिमा तावरे उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड, नागपूर. सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर.
११. सुरेश पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब, उस्मानाबाद. उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव, जि. बीड.
१२. डॉ. शीतल जानवे उप प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय, सांगली. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, सातारा.
१३. सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती. उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड, नाशिक़
१४. नंदकिशोर भोसले सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर. सहायक पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड शहर.
१५. अभिजित फस्के उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड. उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी, जि. सोलापूर.
१६. संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर. उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी, जि. यवतमाळ.
१७. सचिन हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे. पोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर.
१८. विलास सानप पोलीस उप अधीक्षक, अकोला. उप विभागीय पोलीस अधिकारी, मीरा रोड, ठाणे ग्रामीण.
१९. गुणाजी सावंत सहायक पोलीस आयुक्त, कॅन्टोंमेंट, औरंगाबाद. सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.
२०. राजेंद्र चव्हाण सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक, नवी मुंबई. सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.
२१. मोहन ठाकूर सहायक संचालक, पोलीस अकादमी, नाशिक़ सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर.
२२. शिवाजी मुळीक उपविभागीय पोलीस अधिकारी, सिंधुदुर्ग. पोलीस उप अधीक्षक, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी.
२३. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई. उपविभागीय पोलीस अधिकारी,दौंड, पुणे.
२४. सुनील जायभाय उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन उपविभाग. उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई विभाग.
२५. गणेश किंद्रे पोलीस उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद. उप विभागीय पोलीस अधिकारी, कोरेगांव, सातारा.
२६. रामेश्वर वैंजने उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगोली. उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर, कोल्हापूर.
२७. नंदकुमार पिंजण अपर पोलीस उप आयुक्त, पुणे. सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड.

Web Title: Transfer of 150 senior police officers including 43 senior IPS officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.