मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या आरटीओ कार्यालयातील बदल्यांना आता मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या.
राज्य सरकारने २०२१-२२ या चालू आर्थिकवर्षी मर्यादित स्वरूपात बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, हा आदेश रद्द करून नवीन सूचना काढून आता राज्यातील सर्वसाधारण आणि विशेष कारणास्तव करण्यात येणाऱ्या बदल्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
मुंबईतील ११ मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश
बदल्यांमध्ये मुंबईतील ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये स्मिता दिवटे, सुधीर जाधव, सम्राट कांबळे, राहुल पवार, दीपक उगले, सचिन आयरेकर, राजकुमार कुमठाळे, विनोद भोपळे, अविनाश सूर्यवंशी, अश्विनकुमार मोरे, निळोबा तांदळे या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यापैकी काही अधिकाऱ्यांची मुंबईतच बदली करण्यात आली आहे.