राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 02:11 AM2020-01-17T02:11:04+5:302020-01-17T02:11:15+5:30

जलोटा, गोविंदराज, गुप्ता, दराडे, संजीवकुमार आदींचा समावेश

Transfer of 4 Chartered Officers in the State; State Government decision | राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य सरकारचा निर्णय

Next

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनात फेरफार करण्यास सुरुवात केली असून गुरुवारी तब्बल २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात संजीवकुमार, डॉ.के.एच.गोविंदराज, प्रवीण दराडे, राजीव जलोटा, असीमकुमार गुप्ता आदींचा समावेश आहे. लवकरच आणखी काही वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई; मुंबईच्या व्यवस्थापकी संचालक श्रीमती जे मुखर्जी यांची नियुक्ती अल्पसंख्याक विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. आतापर्यंत अल्पसंख्याक विभागात असलेले श्याम तागडे हे आता वस्रोद्योगचे नवे प्रधान सचिव असतील. वस्रोद्योगचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून जात आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे राज्याचे नवे विक्रीकर आयुक्त असतील. आतापर्यंत विक्रीकर आयुक्त असलेले राजीव जलोटा आता ग्रामविकास विभागाचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव असतील. आतापर्यंत ग्रामविकास विभागात प्रधान सचिव असलेले असीमकुमार गुप्ता आता ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असतील.

राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी.वेणुगोपाल वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी.वेलरासू यांची बदली मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. विक्रीकर आयुक्त शैला ए. यांची बदली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी तर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची बदली समाजकल्याण आयुक्त; पुणे या पदावर करण्यात आली आहे.

साताºयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी, मृद व जलसंधारण आयुक्त; औरंगाबाद दीपक सिंगला यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी तर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची साताराच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू लक्ष्मी आता तेथेच जिल्हाधिकारी असतील. पुण्यात आतापर्यंत समाजकल्याण आयुक्त असलेले मिलिंद शंभरकर हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे राज्य वीज वितरण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून जात आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था; पुणेच्या आयुक्तपदी तर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची बदली पुणे महानगर परिवहन महामंडळात करण्यात आली. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी या आता भंडारा जिल्हा परिषदेत त्याच पदावर जात आहेत. भंडारा जि.प.त या पदावर आतापर्यंत असलेले आर.एस.जगताप हे नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त असतील. मदन नागरगोजे माहिती-तंत्रज्ञान विभागाचे नवे संचालक असतील.

माहिती जनसंपर्कची धुरा पांढरपट्टे यांच्या खांद्यावर
माहिती-जनसंपर्क विभागाच्या महासंचालकपदी दिलिप पांढरपट्टे यांची बदली करीत सध्याचे ‘आयपीएस राज’ संपुष्टात आणले आहे. पांढरपट्टे हे सध्या सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी होते. ते उत्तम लेखक, कवी आहेत. आयपीएस अधिकारी असलेले ब्रिजेशसिंग यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे सचिव व महासंचालक म्हणून नियुक्त केले होते. आयपीएस अधिकाºयास या विभागात आणण्याचा तो पहिला प्रयोग होता.

Web Title: Transfer of 4 Chartered Officers in the State; State Government decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.