कारागृहातील ५ अप्पर अधीक्षक, उपअधीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:10 AM2021-08-18T04:10:37+5:302021-08-18T04:10:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या २ अतिरिक्त अधीक्षक व ३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या २ अतिरिक्त अधीक्षक व ३ उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाच्या वतीने नुकतेच त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.
जेलमधील वर्ग -१ (गट -अ) दर्जाच्या अप्पर अधीक्षक व वर्ग-२ च्या उपअधीक्षकांच्या बदल्यांबाबत २९ जुलैला बैठक झाली होती.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे)
अप्पर अधीक्षक शरद शेळके (कोल्हापूर मध्यवर्ती जेल - येरवडा खुले जिल्हा कारागृह), भारत भोसले (कल्याण जिल्हा कारागृह - अमरावती मध्यवर्ती जेल), उपअधीक्षक सर्वश्री नागनाथ सावंत (अहमदनगर जिल्हा कारागृह - अलिबाग), पेट्रस गायकवाड (अमरावती मध्यवर्ती कारागृह - अहमदनगर जेल), चंद्रमणी इंदूरकर (येरवडा सेंट्रल जेल - कोल्हापूर सेंट्रल जेल).