शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना १० ऑगस्टपर्यंत स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 01:33 AM2020-07-24T01:33:08+5:302020-07-24T01:33:15+5:30
गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याची सूट
मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांना आता १० ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तसा आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी काढला. यापूर्वी ३१ जुलैपर्यंत या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ही मुदत वाढविण्यात आली आहे.
राज्य सरकारने १५ टक्के कर्मचाºयांच्या बदल्या करता येतील, असा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. मात्र, उर्वरित बदल्यांच्या स्थगितीची मुदत गुरुवारी १० आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. यात आयएएस आणि आयपीएस अधिकाºयांचा समावेश नाही.
वैैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार
च्शासकीय सेवेतील गर्भवती महिला आणि व्याधीग्रस्त कर्मचाºयांना कार्यालयात न येण्याची सूट देण्यात आली आहे. मात्र, त्यांना तसे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. च्ज्यांच्यावर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे, ज्यांना हृदयरोग आहे, ज्यांनी केमोथेरपी, इम्युनोसप्रेसिव्हथेरपी घेतलेली आहे, अशा कर्मचाºयांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना उपस्थितीबाबत सूट देण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.