पालिका अधिका-याची बदली रद्द, पुन्हा मूळ जागी नियुक्ती, सूडबुद्धीने बदली केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:37 AM2017-10-31T05:37:23+5:302017-10-31T05:37:50+5:30

महापालिकेच्या एन विभागातील अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या वरीष्ठ निरीक्षकाची संबंधित महापालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी नियमबाह्य बदली केल्याचे चौकशीत आढळल्याने अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) यांनी त्या वरीष्ठ निरीक्षकाची मूळ जागी बदली करण्याचा आदेश दिला आहे.

The transfer of the municipal officer, the appointment of the original, and the replacement of the revenge | पालिका अधिका-याची बदली रद्द, पुन्हा मूळ जागी नियुक्ती, सूडबुद्धीने बदली केल्याचा आरोप

पालिका अधिका-याची बदली रद्द, पुन्हा मूळ जागी नियुक्ती, सूडबुद्धीने बदली केल्याचा आरोप

Next

मुंबई : महापालिकेच्या एन विभागातील अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या वरीष्ठ निरीक्षकाची संबंधित महापालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी नियमबाह्य बदली केल्याचे चौकशीत आढळल्याने अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) यांनी त्या वरीष्ठ निरीक्षकाची मूळ जागी बदली करण्याचा आदेश दिला आहे.
जानेवारी २0१७ मध्ये नवनीत मोरे यांची एन विभागाच्या घाटकोपर येथील कार्यालयात वरीष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मुलन) या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जून महिन्यात मोरे यांची तडकाफडकी मुख्य कार्यालयात अनुज्ञापन विभागात करण्यात आली. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते मनोहर जरीयाल यांनी महापालिकेकडून माहिती मागितली असता महापालिकेच्या नोंदवहीत संबंधित नोंदी तसेच प्रशासकीय अधिकाºयांच्या कार्यालयात माहितीच उपलब्ध नसल्याचे महापालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
नवनीत मोरे यांच्याकडून अतिक्रमणविरोधी कारवाई परिणामकारक होत नसल्याचे निदर्शनास येते. त्यांच्याकडून निर्देशांचे पालन होत नाही. त्यांच्याविरूद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून त्यांच्यावर झालेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, असे महापालिकेने दिलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद आहे. मात्र जरीयाल यांनी मोरेंविरूद्ध आलेल्या तक्रारींच्या प्रती मागितल्या असता एन विभागातील आवक जावक नोंदच नसल्याचे उत्तर देण्यात आले. मोरे यांना वरीष्ठांनी दिलेल्या मेमोंच्या प्रती मागितल्या असता त्या एन विभाग प्रशासकीय अधिकाºयांच्या कार्यालयात उपलब्धच नसल्याचे सांगण्यात आले. मोरे यांच्या कार्यकालात त्यांनी केलेल्या कारवाईची कागदपत्रे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशांच्या प्रतीही ‘संबंधित नाही’, असे नमूद करीत टाळण्यात आले. जरीयाल यांच्या म्हणण्यानुसार, मोरे यांनी या जागी नियुक्ती होण्यापूर्वी जानेवारी २0१५ ते डिसेंबर २0१६ या २४ महिन्यांच्या कालावधीत या विभागाने फेरीवाल्यांबाबत केलेल्या कारवाईपेक्षा मोरे यांची कारवाई पूर्वीच्या कारवार्इंपेक्षा अधिक होती, असे आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे ही बदली सूडबुद्धीने बदली करण्यात आल्याचा आरोप करीत जरीयाल यांनी याबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी चौकशी केली असता संबंधित उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी अनेक नियम धाब्यावर बसवून बदली केल्याचे आढळले. त्यानंतर मोरे यांनी पुन्हा एन विभागात बदली करण्यात आली. दुसºया अधिकाºयाची वर्णी लावण्यासाठी मोरे यांची चुकीच्या पद्धतीने बदली करण्यात आल्याचा आरोप जरीयाल यांनी केला आहे.

कामगिरी उत्कृष्ट तरीही बदली
- मनोहर जरीयाल यांच्या म्हणण्यानुसार, मोरे यांनी या जागी नियुक्ती होण्यापूर्वी जानेवारी २0१५ ते डिसेंबर २0१६ या २४ महिन्यांच्या कालावधीत या विभागाने फेरीवाल्यांबाबत १२ हजार ११९ प्रकरणे नोंदवून २९ लाख ६६ हजार ४७४ रूपये दंड वसूल केला होता.
- ही सरासरी कारवाई दरमहा ५0८ प्रकरणे आणि १ लाख २३ हजार ६0३ रूपये दंड इतकी होती. मोरे यांच्या चार म्ािहन्यांच्या काळातील सरासरी दरमहा कारवाई ११३७ प्रकरणे आणि २ लाख ३५ हजार ४00 रूपये दंड इतकी होती.

Web Title: The transfer of the municipal officer, the appointment of the original, and the replacement of the revenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.