लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ११ अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह एकूण ३८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाच्या वतीने रात्री उशिरा जारी करण्यात आले.
५ अधिकाऱ्यांना अप्पर महासंचालकाचे तर प्रत्येकी ३ डीआयजी व विशेष महानिरीक्षक, सह आयुक्त म्हणून बढती देण्यात आली. अप्पर महासंचालक (आस्थापना) के. के. सरंगल यांची बदली करण्यात आली असून, त्यांना नंतर पोस्टिंग दिले जाणार आहे.
अधीक्षक, उपायुक्त, उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या दोन दिवसांत जारी केल्या जाणार आहेत.
बढती, बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे)
अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (सीआयडी - सुधारसेवा पुणे), संजय वर्मा (मुख्य, दक्षता अधिकारी, म्हाडा - अपर महासंचालक नियोजन व समन्वय, मुंबई), एस. जगन्नाथन (नियोजन व समन्वय ते महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनी, मुंबई), रितेशकुमार (वायरलेस पुणे-सीआयडी), संजीव सिंघल (प्रशासन - आस्थापना), अर्चना त्यागी (राज्य राखीव पोलीस दल - सह व्यवस्थापकीय संचालक, पोलीस गृहनिर्माण विभाग), प्रशांत बुरडे (उपमहासमादेशक, होमगार्ड - मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा), अनुपकुमार बलबिरसिंह (राज्य विद्युत महामंडळ - प्रशासन, मुंबई), सुनील रामानंद (सुधारसेवा पुणे - वायरलेस पुणे), प्रवीण सांळुके (सीआयडी - पदोन्नतीने अपर महासंचालक विशेष अभियान मुंबई), मधुकर पांडे (सागरी सुरक्षा - पदोन्नतीने अप्पर महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा), ब्रिजेश सिंह (प्रशासन - पदोन्नतीने उपमहासमादेशक, होमगार्ड), चिरंजीव प्रसाद (आयजी, नागपूर परिक्षेत्र - पदोन्नतीने राज्य राखीव पोलीस दल), डॉ. रवींद्र सिंघल (नियंत्रक, वैधमापन शास्त्र - त्याच ठिकाणी पदोन्नती).
विशेष महानिरीक्षक/सह आयुक्त
राजेश प्रधान (आस्थापना, पोलीस मुख्यालय - सागरी सुरक्षा, राज्य गुप्त वार्ता विभाग), अश्वती दोरजे (संचालक, पोलीस अकादमी - सह आयुक्त, नागपूर शहर), छेरीग दोरजे (विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा, मुंबई - विशेष महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र), यशस्वी यादव (सह आयुक्त, वाहतूक शहर - विशेष महानिरीक्षक, सायबर विभाग, मुंबई), राजवर्धन (महिला अत्याचार प्रतिबंधक - सह पोलीस आयुक्त, वाहतूक मुंबई शहर), अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त सोलापूर - पदोन्नतीने विशेष महानिरीक्षक, सुधार सेवा मुंबई), राजेश कुमार मोर (केंद्रीय प्रतिनियुक्तीने प्रतीक्षेत संचालक, पोलीस अकादमी).
अप्पर आयुक्त / उपमहानिरीक्षक
प्रवीण पडवळ (अप्पर आयुक्त, वाहतूक, मुंबई शहर - अप्पर आयुक्त उत्तर विभाग, मुंबई शहर), सुनील कोल्हे (अप्पर आयुक्त विशेष शाखा, मुंबई शहर - सहआयुक्त, गुप्त वार्ता विभाग, सध्याचे पद पदावनत करून), डी.आर. कराळे (अपर आयुक्त, पूर्व विभाग, ठाणे शहर - आयुक्त, सोलापूर शहर), बी.जे. शेखर (अप्पर आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई - उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, सध्याचे पद पदावनत करून), एम.आर. घुर्ये (उपमहानिरीक्षक, राज्य राखीव दल नागपूर - अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई), आर.बी. डहाळे (वायरलेस पुणे - अप्पर आयुक्त, दक्षिण विभाग पुणे शहर), अशोक मोराळे (अप्पर आयुक्त, गुन्हे, पुणे शहर - अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, ठाणे शहर), अशोक कुंभारे (अप्पर आयुक्त, पश्चिम विभाग ठाणे - उपमहानिरीक्षक, राज्य राखीव दल, नागपूर), दिलीप सावंत (अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग - अप्पर आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई शहर), आर.एन. पोकळे (अप्पर आयुक्त पिंपरी चिचवड - अप्पर आयुक्त - पश्चिम विभाग, ठाणे शहर), संजय शिंदे (अप्पर आयुक्त पुणे - अप्पर आयुक्त, पिंपरी चिंचवड), संजय ऐनपुरे (अप्पर आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर - उपमहानिरीक्षक, वायरलेस, पुणे), सत्यनारायण (अप्पर आयुक्त, दक्षिण विभाग - अप्पर आयुक्त, वाहतूक मुंबई शहर), राजीव जैन (उपायुक्त परिमंडल २ - पदोन्नतीने अप्पर आयुक्त विशेष शाखा, मुंबई शहर), अभिषेक त्रिमुखे (उपायुक्त परिमंडल ९ - पदोन्नतीने उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस दल), सुधीर हिरेमठ (उपायुक्त, पिंपरी चिंचवड - पदोन्नतीने उपमहानिरीक्षक सीआयडी).