Join us

राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 6:36 PM

या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली आहे. 

मुंबई - राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढत आहे. या संकटाला सामोरे जाण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशा शब्दांत टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर बदल्यांवरुन निशाणा साधला होता. तसेच, एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो?, असा सवालही उपस्थित केला होता. मात्र, बदल्यांचे हे सत्र सुरूच आहे. राज्यातील आणखी 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली आहे. 

राज्यातील बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व पदं

1. अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प मुंबई या रिक्त पदावर 

2) विवेक जॉन्सन अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा  या पदावर

3) अमित सैनी सहायक विक्रीकर आयुक्त मुंबई यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ मुंबई या रिक्त पदावर 

4) दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम, यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गोंदिया या पदावर 

5)  एस. राममूर्ती, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी बुलढाणा या रिक्त पदावर 

6) प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती आयुक्त समाजकल्याण कल्याण, पुणे, या पदावर 

टॅग्स :केंद्रीय लोकसेवा आयोगबदलीमुंबईभंडारा