Join us

एसटीतील बदल्या होणार संगणकीय ॲपद्वारे, कर्मचाऱ्यांना मिळणार समान न्यायाची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:37 PM

ST Transfers: एसटी महामंडळाच्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंतच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे आक्षेप कमी होणार असून सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी नव्या पद्धतीने शक्य होईल, असा दावा महामंडळाने केला आहे.

 मुंबई - एसटी महामंडळाच्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंतच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे आक्षेप कमी होणार असून सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी नव्या पद्धतीने शक्य होईल, असा दावा महामंडळाने केला आहे.

आजारपण, पती-पत्नींची एकाच शहरात नोकरी, आपआपसातील बदली अशा अनेक कारणांस्तव विनंती बदलीचे अर्ज कर्मचारी त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करतात. परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपांमुळे बदल्यांमध्ये अनियमितता होत असते. कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही. कर्मचाऱ्यांचे अर्ज धूळखात पडलेले असतात. याला आळा घालण्यासाठी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांच्या पुढाकाराने बदल्यांसंदर्भातील संगणकीय ॲप विकसित करण्यात येत आहे.

ॲपचा फायदा काय?कर्मचाऱ्यांना समान न्याय देण्याबरोबरच महामंडळाच्या मनुष्यबळाचा क्षेत्रनिहाय समसमान वापर करण्यासाठी ॲप उपयुक्त ठरणार आहे. या संगणकीय ॲपद्वारे बदलीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.महामंडळाचा पसाराएसटीत चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत ८७ हजार कर्मचारी कार्यरत एक मध्यवर्ती कार्यालय, सहा प्रदेश, त्या प्रदेशांतर्गत ३१ विभाग आणि २५१ आगारे  तीन मध्यवर्ती कार्यशाळा, ९ टायर पुन:स्तरण प्रकल्प आणि एक मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थाविनंती बदलीचे अर्ज ॲपद्वारे विभागांतर्गत एका आगारातून दुसऱ्या आगारात, प्रदेशांतर्गत एका विभागातून दुसऱ्या विभागात आणि राज्यात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात विनंती बदलीचे अर्ज ॲपद्वारे भरून घेण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्याला विनंती बदलीमध्ये  तीन पर्याय देण्याची मुभा देण्यात आली आहे. विविध जात प्रवर्ग, बिंदुनामावली विचारात घेऊन रिक्त पदाच्या ठिकाणी सेवा ज्येष्ठतेनुसार बदल्या करण्याची संगणकीय पद्धत आहे.

टॅग्स :एसटीमहाराष्ट्र