राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Published: January 5, 2017 06:44 PM2017-01-05T18:44:53+5:302017-01-05T18:44:53+5:30

राज्यातील आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Transfers of Senior Police Officers in the State | राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - राज्यातील आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात एकूण  आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या  देण्यात आल्या आहेत. 
नागपूर शहर येथे सेवेत असलेले सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची मुंबईत राज्य  गुप्तवार्ता विभागात सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.  पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांना पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलीस  महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. तर नागपूर विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदावर कार्यरत असलेले रवींद्र कदम यांची सहपोलीस आयुक्त पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. 
पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलीस  महानिरीक्षकपदी कार्यरत असलेले रितेश कुमार यांना अप्पर पोलीस महासंचालक व संचालक, बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य या पदावर बढती देण्यात आली आहे. वैध मापन विभागात नियंत्रक पदावर कार्यरत असलेले अमिताभ गुप्ता यांच्या पदाची श्रेणीवाढ करण्यात आली आहे. 
पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. पदावर कार्यरत असलेले दीपक पांडे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक व सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई. ( सध्या रिक्त असलेले अपर पोलीस महासंचालक दजाचे पद तात्पुरत्या स्वरुपात विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जामध्ये श्रेणी अवनत करुन) बढती देण्यात आली आहे. पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे सेवेत असलेले विजयसिंह मल्हारराव जाधव यांची विशेष पोलीस महानिरीक्षक( प्रशिक्षण व खास पथके ), महाराष्ट्र राज्य, मुंबई. येथे बदली करण्यात आली आहे. तर  नागपूरचे अपर पोलीस आयुक्त प्रतापसिंग संपतराव पाटणकर यांची  विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

Web Title: Transfers of Senior Police Officers in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.