Join us

मुंबईतील २६ साहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:27 AM

मात्र सेवानिवृत्तीला काही महिन्यांचा अवधी असलेल्यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई पोलीस दलातील २६ साहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. सोमवारी त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. एका विभागात दोन वर्षे किंवा अधिक कालावधी झालेल्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र सेवानिवृत्तीला काही महिन्यांचा अवधी असलेल्यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची नावे (कंसात कोठून - कोठे) : अभय शास्त्री (गुन्हे शाखा - अंधेरी), शेखर तोरे (गुन्हे - गुन्हे), रमेश गावित (गुन्हे - वाहतूक), प्रभाकर लोके, विनोद शिंदे (दोघे आर्थिक - गुन्हे), प्रकाश जाधव (विशेष शाखा-१ - आर्थिक), भीमराव इंदुलकर (विशेष शाखा-१ - माटुंगा), सुरेश पाटील (संरक्षण व सुरक्षा - पश्चिम नियंत्रण कक्ष), प्रवीण चिंचाळकर (संरक्षण - संरक्षण), संगीता पाटील (एलए - गुन्हे), सुनील शेजवळ (विमानतळ - विमानतळ), सुभाष वेळे (समतानगर - एलए), दत्तात्रय भरगुडे (सांताक्रुझ - वांद्रे), नंदकिशोर मोरे (बोरीवली - विशेष शाखा-२), दिनेश देसाई (देवनार - विशेष शाखा-१), अस्मिता भोसले (माटुंगा), लता दोंदे (यलोगेट - दोघी वाहतूक), सुनील वडके (एसपी-१ - बोरीवली), भूषण राणे (गुन्हे - डी.एन. नगर), विश्वनाथ भुजबळ (एलए - देवनार), विलास कानडे (पूर्व नियंत्रण कक्ष - विशेष शाखा-१), अरविंद वाढणकर (एलए - आर्थिक गुन्हे), भाऊसाहेब गिते (राजभवन सुरक्षा - विमानतळ), विनय बगाडे (मुख्यालय-२ - नेहरूनगर), माणिकसिंह पाटील (घाटकोपर - मुख्यालय-२), सुहास रायकर (संरक्षण -सांताक्रुझ).

टॅग्स :पोलिस