परिवर्तनवादी मतदार

By Admin | Published: September 30, 2014 11:20 PM2014-09-30T23:20:45+5:302014-09-30T23:20:45+5:30

अलिबाग विधानसभा मतदार संघाने 1952 मधील पहिल्या निवडणुकीपासूनच ‘परिवर्तनवादी मतदार’ अशी आपली ओळख निर्माण केली आहे.

Transformational voters | परिवर्तनवादी मतदार

परिवर्तनवादी मतदार

googlenewsNext
>जयंत धुळप - अलिबाग
अलिबाग विधानसभा मतदार संघाने 1952 मधील  पहिल्या निवडणुकीपासूनच ‘परिवर्तनवादी मतदार’ अशी आपली ओळख निर्माण केली आहे. मतदारांनी गेल्या 13 विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आठ वेळेला शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांस निवडून दिले आहे, तर चार वेळा काँग्रेसला पसंती दर्शविली आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातील या 13 निवडणुका प्रत्येक वेळी अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत.
1952 मधील पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत चौरंगी लढतीत येथील मतदारांनी काँग्रेसचे द.का.कुंटे यांना विजयी केले. यावेळी शेकापचे दिग्गज नेते ना. ना. पाटील यांच्यासह समाजवादी पक्षाचे प्रभाकर पाटील आणि स्वतंत्र उमेदवार क.गो. पाटील हे पराभूत झाले होते. 1957 मध्ये झालेल्या थेट दुरंगी लढतीत मात्र मतदारांनी काँग्रेसला नाकारुन संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार अॅड. दत्ता पाटील यांना विजयी केले तर काँग्रेसच्या मनोरमा भिडे यांना पराभूत केले. 
1962 मध्ये चौरंगी लढतीत या परिवर्तनवादी मतदाराने काँग्रेसचे अॅड. दत्ता खानविलकर यांच्या गळ्य़ात विजयी माला घालून संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार अॅड. दत्ता पाटील यांच्यासह प्रजा समाजवादी पक्षाचे प्रभाकर का. कुंटे व जनसंघाचे अ.म. ओक यांना पराभूत केले. 1967 मध्ये थेट दुरंगी लढतीत कॉग्रेसचे अॅड. दत्ता खानविलकर यांना नाकारुन प्रथमच शेकापचे उमेदवार म्हणून रिंगणात आलेले अॅड. दत्ता पाटील यांना पुन्हा विजयी केले. 1972 मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत काँग्रेसचे नूतन उमेदवार नारायणराव भगत यांना विजयी करताना स्वतंत्र रिंगणात उतरलेले अॅड. दत्ता खानविलकर आणि शेकापचे वसंत राऊत या दोघांना पराभूत केले. 
1978 मध्ये तिरंगी लढतीत शेकापचे अॅड. दत्ता पाटील यांना या मतदाराने पुन्हा निवडून देताना काँग्रेसचे अॅड. दत्ता खानविलकर व जनता पक्षाचे प्रा. एम.पी. पाटील यांना पराभूत केले. 198क् मध्ये थेट दुरंगी लढतीत काँग्रेसचे ना.का. भगत यांना पराभूत करुन शेकापच्या अॅड.दत्ता पाटील यांना पुन्हा विजयी केले. 1985 मध्ये दुरंगी लढतीत ए.जी.पाटील (काँग्रेस) व 199क् मध्ये पंचरंगी लढतीत विजय कवळे(काँग्रेस), अजरुन पाटील (शिवसेना), राम प्रसाद सिंग (दूरदर्शी पार्टी) व अपक्ष अरुण उकारडे यांना पराभूत करुन सलग दोन्ही वेळेस शेकापच्या अॅड. दत्ता पाटील यांना विजयी केले. 1995 मध्ये तिरंगी लढतीत प्रशांत पाटील(शिवसेना), विजय कवळे (काँग्रेस), रमेश डाऊर (अपक्ष) व नामसाधम्र्याचे उमेदवार दत्ता पाटील यांना पराभूत करुन तर 1999 मध्ये काँग्रेसचे मधुकर ठाकूर, शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे व नामसाधम्र्याचे उमेदवार दत्ता पाटील यांना पराभूत करुन शेकापच्या महिला उमेदवार मीनाक्षी पाटील यांना सलग दोन वेळी मतदारांनी विजयी केले.
2क्क्4 मध्ये काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांना मतदारांनी कौल देताना मीनाक्षी पाटील (शेकाप), नरेश रहाळकर (शिवसेना), संतोष धुमाळ (अ.भारतीय सेना), सुरेंद्र पालकर (बसपा), नामसाधम्र्याच्या सहा मीनाक्षी पाटील, नामसाधम्र्याचे एक मधुकर ठाकूर व दोन अपक्ष अशा एकूण 13 उमेदवारांना पराभूत केले. 2क्क्9 मध्ये मात्र काँग्रेसच्या मधुकर ठाकूर यांना नाकारुन शेकापच्या मीनाक्षी पाटील यांना तिस:यांदा विजयी केले.
 
अलिबाग मतदार संघाने राज्यास काय दिले..
4महाराष्ट्र विधानसभेचे    विरोधी पक्षनेते स्व.अॅड.दत्ता पाटील.
4स्व.यशवंतराव चव्हाण व स्व.वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात उपमंत्री अॅड.दत्ता खानविलकर.
4स्व.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील.
 
आता 2क्14 मध्ये अलिबाग विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे सुभाष तथा पंडितशेठ पाटील, काँग्रेसचे मधुकर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड.महेश मोहिते, शिवसेनेचे महेंद्र हरी दळवी व भाजपाचे प्रकाश काठे अशा प्रमुख उमेदवारांमध्ये ख:या अर्थाने पंचरंगी लढत होणार आहे. 
15 ऑक्टोबर रोजी मतदान होवून 19 ऑक्टोबरच्या मतमोजणी अंतीच या मतदाराने आपली ‘परिवर्तनवादी मतदार’ ही ओळख अबाधित राखली आहे किंवा नाही हे स्पष्ट होवू शकणार आहे.

Web Title: Transformational voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.