पर्यावरणपूरक ‘ईस्टर तेल’ ऊर्जेद्वारे बोरिवलीत ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:04 AM2021-05-02T04:04:11+5:302021-05-02T04:04:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटीने कृत्रिम ईस्टर तेलाचा वापर केलेले भारतातील पहिले २२० केव्ही ऊर्जेचे, १२५ एमव्हीए ...

Transformers in Borivali powered by environmentally friendly ‘Easter oil’ energy | पर्यावरणपूरक ‘ईस्टर तेल’ ऊर्जेद्वारे बोरिवलीत ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

पर्यावरणपूरक ‘ईस्टर तेल’ ऊर्जेद्वारे बोरिवलीत ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटीने कृत्रिम ईस्टर तेलाचा वापर केलेले भारतातील पहिले २२० केव्ही ऊर्जेचे, १२५ एमव्हीए क्षमतेचे ऊर्जा रोहित्र त्यांच्या पारेषण जाळ्यात बोरिवलीच्या २२० केव्ही अतिरिक्त हाय व्होल्टेज (ईएचव्ही) उपकेंद्रात कार्यान्वित केले.

हे रोहित्र पारंपरिक खनिज तेलाच्या रोहित्राऐवजी कृत्रिम ईस्टर तेलाचे असून कमी उष्णतेचे दहन करणारे आहे. याशिवाय हे रोहित्र अतिरिक्त अग्निसुरक्षा, उच्च तापमानात अधिक चांगले निकाल व पृथक पेपर या नात्याने दीर्घकाळ टिकू शकणारे आहे. हे तेल जैवविघटनाद्वारे तयार केलेले असल्याने ते पर्यावरणपूक आहे.

अदानी सध्या त्यांच्या परवाना क्षेत्रात एकूण विजेच्या ३० टक्के पुरवठा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून करण्याचे आश्वासन देते. हे कृत्रिम ईस्टर तेलाने भरलेले २२० केव्ही, १२५ एमव्हीए क्षमतेचे रोहित्र मेसर्स सिमेन्स लिमिटेड, कळवा युनिटने पुरवले आहे. ते १५ दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.

.....................................

Web Title: Transformers in Borivali powered by environmentally friendly ‘Easter oil’ energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.