मुंबई - व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या अपमानानंतर ट्रान्सजेंडरचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 06:46 PM2017-10-25T18:46:44+5:302017-10-25T18:49:17+5:30

व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेला अपमान आणि शिव्यांमुळे त्रस्त एका 33 वर्षीय ट्रान्सजेंडरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

Transgender's suicide attempt after the insults at the WhatsApp group | मुंबई - व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या अपमानानंतर ट्रान्सजेंडरचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या अपमानानंतर ट्रान्सजेंडरचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

मुंबई - व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेला अपमान आणि शिव्यांमुळे त्रस्त एका 33 वर्षीय ट्रान्सजेंडरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. रुममेट्स झोपले असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. रविवारी सकाळी ही घटना घडली. यासंबंधी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या या ट्रान्सजेंडरचं नाव अनिता वाडेकर असं आहे. रविवारी सकाळी सव्वा पाच वाजता तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा खुर्चीचा आवाज तिच्या रुममेटने ऐकला आणि अनिता गळफास लावून आत्महत्या करत असल्याचं तिने पाहिलं. तिने आरडाओरड करत सर्वांना एकत्र केलं, आणि अनिताला खाली उतवरलं. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, ज्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

अनिता वाडेकर 'किन्नर माँ' नावाची एक एनजीओ चालवते. ही एनजीओ ट्रान्सजेंडर्सच्या अधिकारासाठी काम करते. एनजीओचे जवळपास पाच हजार सदस्य आहेत. जिग्ना खत्री, रिना विकास आणि प्रिया पाटील यांच्यामुळे अनिताचा जीव वाचला. 

संस्थेच्या चेअरपर्सन सलमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काही बोगस ट्रान्सजेंडर्सनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये अनिता वाडेकरसहित संस्थेच्या सहा ते सात जणांना 16 ऑक्टोबर रोजी अॅड करण्यात आलं होतं'. सलमा यांच्या म्हणण्यानुसार, 'ग्रुप चालवणा-या काही गे लोकांनी संस्थेच्या सदस्यांना धमी देण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी शिवीगाळ करणारे जवऴपास 250 ऑडिओ मेसेज पाठवले होते. ते सर्व अनिताला जाणुनबुजून त्रास देत होते, ज्यामुळे अनिता नैराश्यात गेली होती'.      
 
'यारों की यारी सबसे प्यारी' नावाने असलेल्या या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये  जवळपास 120 सदस्य आहेत. पार्कसाइट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितलं आहे की, 'व्हॉट्सअॅप ग्रुपवर देण्यात आलेल्या त्रासामुळेच आपण हे पाऊल उचललं'.

Web Title: Transgender's suicide attempt after the insults at the WhatsApp group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.