मुंबई : आपल्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी प्रत्येक जण चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत असतो. यात राजकारणीही मागे नाहीत. आरक्षण व प्रभाग फेररचनेने अनेकांची कारकिर्द धोक्यात आणली आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी चांगल्या संधीच्या शोधात बहुतांशी नगरसेवक आहेत. यापैकी काहींनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच अन्य पक्षांमध्ये उड्या घेतल्या आहेत तर काही पक्षांतराच्या मार्गावर आहेत.यापूर्वी आरक्षण नसल्याने वर्षानुवर्षे एकाच नगरसेवकाची त्या-त्या प्रभागावर मक्तेदारी असे. नवीन चेहऱ्यांना अपवादानेच संधी मिळत होती. मात्र आरक्षणाने ही मक्तेदारी मोडून काढत प्रस्थापितांना जमिनीवर आणले. यामुळे काही निष्ठावंत घरी बसले तर काहींनी अन्य पक्षांचा पर्याय निवडून बाहेरचा मार्ग धरला. मात्र या वेळेस प्रभागांची फेररचना झाल्यामुळे असे पक्षांतर मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. भाजपाला चांगले यश मिळत असल्याने या पक्षाला नाराजांचे प्राधान्य आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचे मार्केट आहे. आतापर्यंत डझनभर नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. (प्रतिनिधी)
अस्तित्वासाठी पक्षांतर
By admin | Published: January 14, 2017 7:21 AM