Join us

मेट्रो कामासाठी वाहतुकीचे नियोजन

By admin | Published: October 06, 2016 4:41 AM

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोच्या बांधकामावेळी मुंबईकरांना झालेला त्रास लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या बांधकामासाठी वाहतुकीचे चोख व्यवस्थापन केले

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोच्या बांधकामावेळी मुंबईकरांना झालेला त्रास लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या बांधकामासाठी वाहतुकीचे चोख व्यवस्थापन केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मेट्रो मार्गांच्या बांधकामावेळी वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडू नये म्हणून प्राधिकरणाने वाहतूक विभागाचीही मदत घेतली आहे. आणि या दोन्ही व्यवस्थापनांच्या समन्वयाद्वारे विनाअडथळा मेट्रोचे बांधकाम मुदतीत करण्याकडे एमएमआरडीएचा कल असणार आहे.वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी हा मार्ग बांधताना प्राधिकरणाला मुंबईकरांसह राजकीय पक्षांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ चे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच प्राधिकरणावर जोरदार टीका होऊ लागली आहे. गिरगावकरांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून यापूर्वीच आंदोलने केली आहेत. त्यात आता एमएमआरडीएने मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या कामालाही हात घातला आहे. विशेषत: यापूर्वी मुंबईत उभारण्यात आलेला मेट्रो मार्ग आणि भविष्यात उभारण्यात येणारे मेट्रो मार्ग हे सर्व एकमेकांना जोडण्यावर प्राधिकरणाचा भर आहे. तत्पूर्वी हे मेट्रो मार्ग उभारताना प्राधिकरणाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बाधितांच्या पुनर्वसनापासून वाहतुकीचे चोख नियोजन करताना प्राधिकरणाची दमछाक होणार आहे. परिणामी ही दमछाक होऊ नये म्हणून प्राधिकरणाने आतापासूनच कठोर पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)दोन्ही मार्गांचे बांधकाम आॅगस्ट महिन्यापासून सुरू झाले आहे.बांधकामासाठी २-३ वाहतूक मार्गिका बंद राहतील.या दोन मेट्रो मार्गांवरून १२ लाख प्रवासी प्रवास करतील.वाहतूककोंडी कमी होईल.वाहतूक साहाय्यक : ५००बॅरिकेडिंग : ५ हजारवॉकीटॉकी संच : २००दुचाकी : ४२दोरखंड : ५० हजार मीटरसूचना फलक : २ हजार २९८पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूकदारांना सूचनाआंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणाऱ्या शिवाजी महाराज पुतळ्यापासून दहिसरच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्गावर परतीची मार्गिका गर्दीवेळी उपलब्ध होईल.सेवा रस्त्यांवरील पार्किंग व इतर अडथळे दूर करून सेवा रस्ते उपलब्ध होतील. वांद्रे/अंधेरीपासून दहिसरपर्यंत अतिरिक्त वातानुकूलित सेवा उपलब्ध होईल.मेट्रो २-अदहिसर ते डी.एन. नगर१८.६ किलोमीटर१७ स्थानकेमेट्रो ७दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व१६.५ किलोमीटर१३ स्थानके