ठळक मुद्देपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेतलोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
मुंबई : टॅम्पिंग मशीन रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री पालघर आणि केळवे दरम्यान मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर रुळ दुरुस्ती करणारे टॅम्पिंग मशीन घसरले. यामुळे या मार्गावरील लोकलसेवा आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. तर, चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.