ट्रक पार्किंगची जागा आवास योजनेसाठी वापरण्यास वाहतूकदारांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:06 AM2020-12-26T04:06:48+5:302020-12-26T04:06:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एपीएमसी मार्केटच्या ज्या भूखंडावर ट्रक पार्क केले जातात त्या भूखंडावर घरे बांधण्याची सरकारची योजना ...

Transporters oppose use of truck parking space for housing scheme | ट्रक पार्किंगची जागा आवास योजनेसाठी वापरण्यास वाहतूकदारांचा विरोध

ट्रक पार्किंगची जागा आवास योजनेसाठी वापरण्यास वाहतूकदारांचा विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एपीएमसी मार्केटच्या ज्या भूखंडावर ट्रक पार्क केले जातात त्या भूखंडावर घरे बांधण्याची सरकारची योजना आहे. त्याला वाहतूकदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुंबईसाठी भाजीपाला आणि अन्नपदार्थांचा मुख्य स्रोत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) घाऊक बाजारातील ट्रक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे वाहतूकदार संघटनांनी सांगितले.

व्यावसायिक वाहन पार्किंगसाठी वाटप केलेली ही जमीन विकसित केली जाईल अशी आम्हाला आशा होती, पण प्रभावित वाहतूकदारांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आला आहे, असे अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसचे अध्यक्ष कुलतरनसिंग अटवाल यांनी याचिकेत म्हटले आहे.

एपीएमसी मार्केटजवळील जमीन गृह निर्माण प्रकल्पास देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. त्याच्या विरोधात संघटनेकडून आवाज उठवला जाईल, असे कोअर कमिटीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी सांगितले.

................................

Web Title: Transporters oppose use of truck parking space for housing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.